महात्मा गांधीचे विचित्र चित्र रेखाटणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा; काँग्रेस नगरसेविकेची मागणी

महाड येथे  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचित्र रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण जनजागृतीसाठी महाड नगर परिषदेने लावलेल्या बॅनर्सवर महात्मा गांधी यांचे विचित्र रंगविण्यात आले आहे. हे चित्र रेखाटणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

महाड :  महाड येथे  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचित्र रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण जनजागृतीसाठी महाड नगर परिषदेने लावलेल्या बॅनर्सवर महात्मा गांधी यांचे विचित्र रंगविण्यात आले आहे. हे चित्र रेखाटणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेविका भाग्यश्री फुटाणकर यांनी मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडे ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी  एका निवेदनाद्वारे केली आहे.

शहरात विविध ठिकाणी लावलेल्या बॅनरवर हे रेखाचित्र काढण्यात आले आहे. राष्ट्र पित्याचे हे छायाचित्र चुकीच्या पद्धतीने रेखाटण्यात आले असल्याने ते त्वरीत बदलावे अशी मागणी मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे मुख्याधिकाऱ्यानी दुर्लक्ष केल्याने हे निवेदन देण्यात आले आहे.  बॅनरवरील महात्मा गांधी यांचे हे छायाचित्र बदलण्यात यावे आणि या ठेकेदारावर कारवाई करण्यात येवून त्याला बिल देण्यात येवू नये अशी मागणी फुटाणकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.