सुधागडमध्ये मुसळधार पाऊस

पाली :रायगड जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असून, पुढील तीन तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. सुधागड तालुक्यात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होते. त्यामुळे

 पाली :रायगड जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असून, पुढील तीन तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. सुधागड तालुक्यात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होते. त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसून येत होती. दुपारी चारनंतर पावसाने जोर धरला. पावसाची संततधार ही संध्याकाळपर्यंत चालूच होती. नदी नाले, ओढे हे भरभरून वाहू लागले. हवामान खात्याने दुपारनंतरच्या सुमारास दिलेल्या इशार्‍यानुसार, रायगडसह मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुढील तीन तास पावसाचा जोर राहणार असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.