सुधागडला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले

पाली : अवकाळी आलेल्या पावसाने संपूर्ण सुधागडला झोडपून काढले आहे. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे, पावसामुळे सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसत होते.सुधागाडमधील

 पाली : अवकाळी आलेल्या पावसाने संपूर्ण सुधागडला झोडपून काढले आहे. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे, पावसामुळे सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसत होते.सुधागाडमधील पाच्छापूर,नाडसुर,धोंडसे,पाली या भागात दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. तर अन्य भागात संध्याकाळी चारनंतर सुरुवात केली.वादळी वाऱ्याचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते की पाच्छापूर येथील प्राथमिक शाळा,तसेच अनेक घरांवरचे छप्पर उडून गेले आहे.घरांच्या भिंती देखील कोसळल्या.यामध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु दुपारनंतरच्या पावसाने आपला जोर कायम ठेवला.वादळी वाऱ्यासह सुधागडात विजांच्या गडगडासह पावसाने पाणीच पाणी केले आहे.