सुतारवाडी पंचक्रोशिमध्ये पावसाने केला कहर ; शेतकऱ्यांची वाढली चिंता

सुतारवाडीसह सावरवाडी, धगडवाडी, कुडली, जावटे या परिसरा मध्ये भात पिकांबरोबर नाचणी, वरी आणि तिळाचे पिक प्रामुख्याने घेतले जातात. तिळाच्या रोपांना पिवळी सुंदर फुलेही आलेली आहेत. तसेच भाताला कणसंही आलेली आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये भातपिक कापणी योग्य होत असते.

सुतारवाडी :   गेल्या पंधरा दिवसांपासून (Last 15 days) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाचे विजेच्या लखलखाटात सह जोरदारपणे (Heavy  rainfall) आगमन व्हायचे. मात्र कालपासून दुपारी एक वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर पडत असलेल्या पावसामुळे बळीराजा चिंतेत दिसत आहे. सप्टेंबर महिना (September month) आता थोड्या दिवसांनी संपणार आहे. आता पावसाने परतीचा प्रवास करणे आवश्यक असताना दररोज पणे पडणाऱ्या पावसामुळे चांगले आलेले पीक वाया जातील की काय या विवंचनेत येथील शेतकरी वर्ग आहे. (Rains in Sutarwadi Panchkroshi)

सुतारवाडीसह सावरवाडी, धगडवाडी, कुडली, जावटे या परिसरा मध्ये भात पिकांबरोबर नाचणी, वरी आणि तिळाचे पिक प्रामुख्याने घेतले जातात. तिळाच्या रोपांना पिवळी सुंदर फुलेही आलेली आहेत. तसेच भाताला कणसंही आलेली आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये भातपिक कापणी योग्य होत असते. त्यानंतर तीळ आणि नाचणी, वरी ची पीक कापणीस योग्य होतात. गेल्या वर्षी पावसाने चांगली सुरुवात करून परतीचा प्रवास योग्य वेळी केला होता त्यामुळे भात पिक चांगली आली होती. यावर्षी कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. तसेच चक्रीवादळात अनेकांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले.

या विवंचनेत मधून नागरिक अद्यापही सावरलेले नाहीत त्यात दररोज मुसळधार पणे पडणारा पाऊस. यामुळे उभ्या पिकांचे नुकसान तर होणार नाही ना ? असा ज्वलंत प्रश्न अनेक शेतकर्‍यांना पडला आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर ग्रामीण भागात अनेक जण आपल्या घराच्या मागील बाजूस विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करतात. या वर्षी पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे सर्व भाजीपाला पाण्याने कुजलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे सर्वत्र गावठी भाज्यांची चव चाखायला मिळणार नाही. काल पावसाने एक वाजता सुरुवात केली ती पाच वाजेपर्यंत पडत राहिला. यामुळे चार तास लाईट गायब होती. या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.