राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पेणमध्ये वृक्षारोपणासह राबविण्यात आले अनेक उपक्रम

पेण: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस काल पेण तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभेत राज ठाकरे यांचा वाढदिवस रुपेश पाटील

पेण: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस काल पेण तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभेत  राज ठाकरे यांचा वाढदिवस रुपेश पाटील यांच्या आयोजनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस साजरा करताना वृक्षलागवड, रुग्णालयांत फळवाटप, फुटपाथवरील गोरगरीब लहान मुलांना खाऊ वाटप असे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले होते. 

रायगड जिल्ह्यात चक्री वादळामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली होती. त्यामुळे शक्य तेवढ्या वृक्षांची लागवड करणे गरजेचे होते. म्हणून राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आली.  पेण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. फुटपाथवर राहणाऱ्या लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी मनोहर नाईक तालुका सचिव, हनुमान नाईक विभाग अध्यक्ष, रोहित पाटील, राकेश पाटील,रोशन पाटील,रणजीत पाटील, निकेश पाटील, अजय खाडे आदीसह मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.