लोहार तुर्भे पंचक्रोशीतील रामभक्तांनी लाडू वाटून केला आनंदोत्सव

  • गावातील मंदिरात आरती ओवाळून भक्तांनी मुंबई - गोवा महामार्गावर नागरिकांना लाडू वाटप करून आनंद व्यक्त केला. राममंदिराचे भूमिपूजन हे आम्हा रामभक्तांसाठी मोठा उत्सव असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे

पोलादपूर : आज अयोध्या येथे राम मंदिर भुमिपूजन असल्याने राम भक्तांमध्ये प्रचंड आनंद निर्माण झाला आहे. पोलादपूर येथील लोहार तुर्भे येथील पंचक्रोशीतील रामभक्तांनी आनंद व्यक्त केला. गावातील मंदिरात आरती ओवाळून भक्तांनी मुंबई – गोवा महामार्गावर नागरिकांना लाडू वाटप करून आनंद व्यक्त केला.  राममंदिराचे भूमिपूजन हे आम्हा रामभक्तांसाठी मोठा उत्सव असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे

यावेळी संभाजी साळुंखे, सहदेव उतेकर, बाबाजी उतेकर, मधुकर उतेकर, रामचंद्र साळुंखे ,वसंत धुमाळ, शांताराम साळुंखे ,गजानन जंगम, नामदेव उतेकर ,नामदेव साळुंखे, प्रदीप सुर्वे, दत्‍तराम पवार, राकेश साळुंखे, रघुनाथ खेडेकर, गोविंद उतेकर, वामन उतेकर, दत्ताराम उतेकर, नाना जाधव, दशरथ उतेकर, वसंत जाधव आणि श्रीराम भक्त उपस्थित होते