केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या निसर्ग चक्रीवादळग्रस्त कोकणचा पाहणी दौरा करणार

पाली : निसर्ग वादळाने नुकसानग्रस्त झालेल्या कोकणचा पाहणी दौरा उद्या १२ जून रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले करणार आहेत. या पाहणी

 पाली : निसर्ग वादळाने नुकसानग्रस्त झालेल्या कोकणचा पाहणी दौरा उद्या १२ जून रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले करणार आहेत.

या पाहणी  दौऱ्यात उद्या सकाळी मुंबईहून मंडणगडकडे रामदास आठवले रवाना होणार असून सर्वप्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी आंबडवे येथे भेट देऊन वादळाने झलेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसेच या नियोजित दौऱ्याबरोबर कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड पनवेल उपमहापौर, दादा साहेब मर्चडे कोकण जेष्ठ नेते, सिद्धार्थ कासारे जिल्हा अध्यक्ष मुंबई, विवेक पवार जिल्हा अध्यक्ष मुंबई,  सुमित मोरे कार्याध्यक्ष  रायगड, रायगड जिल्हा सचिव रवींद्रनाथ ओव्हाळ,  रायगड जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, अमित तांबे कोकण जनता परिषदचे सरचिटणीस, रत्नगिरी जिल्हा अध्यक्ष के डी कदम, सरचिटणीस प्रीतम रुखे, जिल्हा प्रवक्ते अनंत पवार, युवक जिल्हा अध्यक्ष आदेश मर्चडे, खेड तालुका अध्यक्ष रजनीकांत जाधव, सरचिटणीस सुरेंद्र तांबे, युवक अध्यक्ष विकास धोत्रे सोबत असणार आहेत. त्याप्रमाणे मंडणगड तालुक्यातील सावरी; पचारळ; वेळास; बाणकोट; या गावांना भेट देऊन रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमंडला ; हरिहरेश्वर;आदगाव या गावांना भेटी देऊन  माणगाव मार्गे मुंबई ला परतणार आहेत.  अशी माहिती रिपाइं कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ यांनी दिली आहे.