एका महिलेवर बलात्कार करून पळून जाणाऱ्या ट्रेलर चालकाचा पोलिसांनी केला पाठलाग – काही तासांमध्ये केले अटक

पनवेल: टी पॉईंट उरणकडे जाणार्‍या सर्व्हीस रोडवर ट्रेलरमध्ये एका महिलेवर बलात्कार करून पळून जाणार्‍या आरोपी ट्रेलर चालकाचा पाठलाग करून काही तासात पनवेल पोलिसांनी मुसक्या

 पनवेल: टी पॉईंट उरणकडे जाणार्‍या सर्व्हीस रोडवर ट्रेलरमध्ये एका महिलेवर बलात्कार करून पळून जाणार्‍या आरोपी ट्रेलर चालकाचा पाठलाग करून काही तासात  पनवेल पोलिसांनी मुसक्या आवळल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. 

 बुधवारी टी पॉईंट उरणकडे जाणार्‍या रोडच्या  सर्व्हिस रोडवर पहाटे ३:०० वाजण्याच्या सुमारास  ट्रेलरमध्ये एका महिलेवर ट्रेलर चालकाने बलात्कार करून तो पळून गेल्याबाबत नियंत्रण कक्ष नवीमुबई यांनी रात्रपाळी ठाणे अंमलदार  उप निरिक्षक सरिता मुसळे यांना संदेश दिल्यावर उप निरिक्षक सरिता मुसळे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पीडित महिलेकडे चौकशी केली असता तिने माहिती दिली. पुणे येथे राहत असलेल्या  पतीला भेटण्यासाठी ती उत्तरप्रदेशमधून आली असून  सदर ट्रेलरमध्ये बसून पुणे येथे चालली होती. परंतु ट्रेलर चालकाने तिला पुणे येथे घेऊन न जाता या ठिकाणी आणून तिच्यावर  बलात्कार करून  ट्रेलर चालक तिला सोडून पळून गेला आहे. या ट्रेलरचा नंबर १७७० असे असल्याचे व तो इसम दाढीवाला पंजाबी असून त्याच्या  हाताचे बोटांना चावा घेऊन बोट फोडल्याचे तिने सांगितले. हा प्रकार खरा असल्याची खात्री  झाल्याने उप निरिक्षक सरिता मुसळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना या बलात्कार प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी या प्रकाराबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे व स्टाफ यांना सदर प्रकाराबाबत माहिती देऊन घटनास्थळी जाऊन सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे उपनिरीक्षक  सुनील तारमळे व स्टाफ यांनी खाजगी इनोव्हा वाहनाने उरण दिशेकडे सदर ट्रेलर व आरोपीचा शोध सुरु केला. यावेळी जे डब्ल्यू आर वेयर हाऊस जवळ रोडचे एका बाजूस ट्रेलर नंबर एम एच.४३.बी.पी.१७७० हा उभा होता. या ट्रेलरचा नंबर व पीडित महिलेने दिलेला नंबर मिळता जुळता असल्याने त्यांनी सदर ठिकाणी वाहन थांबून ट्रेलरचे चालकाचा शोध घेतला असता तो केबिनमध्ये दरवाजे बंद करुन झोपला होता. त्याचे वर्णन पीडित महिलेने दिलेले वर्णनाप्रमाणे होते. पोलीस उपनिरीक्षक  सुनील तारमळे यांनी  पोलीस असल्याची ओळख देऊन त्यास केबिनचा दरवाजा खोलून बाहेर येण्यास आवाज दिला असता त्याने अचानक उठून ट्रेलर चालू करून ट्रेलर उलट्या दिशने वळवून पनवेल टी पॉइंटच्या दिशेने ट्रेलर घेऊन जाऊ लागला. 

 पोलिसांनी त्यास ते पोलीस असल्याचे व फक्त त्याच्याकडे चौकशी करायची आहे असे ओरडून सांगून त्यास थांबण्याचा इशारा केला परंतु तो थांबला नाही. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक तारमळे यांनी  इनोव्हा गाडीने त्याचा पाठलाग सुरु केला. हा ट्रेलर चालक आरोपी असल्याची खात्री झाल्याने त्यास पकडण्यासाठी अतिरिक्त मदतीसाठी  फोनद्वारे नियंत्रण कक्ष नवीमुंबई तसेच रात्रपाळी ठाणे अंमलदार उप निरिक्षक सरिता मुसळे यांना माहिती दिली. हा ट्रेलर चालक हा ट्रेलर थांबविण्यास तयार नव्हता. तो कधी उरणकडे तर कधी पनवेल दिशेकडे कट मिळेल तेथे दिशा बदलत होता. पोलिसांचा  खाजगी इनोव्हा गाडीमधून पाठलाग चालूच होता.  पाठलाग चालू असल्याबाबत वेळोवेळी नियंत्रण कक्ष नवी मुंबई यांना  तसेच टी पॉईंट, कळंबोली सर्कल , पळस्पे चेकपोस्ट येथे एखादा ट्रेलर आडवा लावण्यासाठी कळविण्यात येत होते. पळस्पे चेकपोस्ट ड्युटीस असणारे पोलीस उपनिरीक्षक कादबाने व स्टाफ यांनी टी पॉईंट येथे येऊन हा ट्रेलर थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु तो थांबला नाही.  ट्रेलर टीपॉईंट येथून पळस्पेकडे पास झाल्याने उपनिरीक्षक  तारमळे यांनी पुन्हा  ट्रेलरच्या मुव्हमेंटबाबत माहिती नियंत्रण कक्ष यांना दिली. त्याप्रमाणे पळस्पे चेकपोस्ट येथे एक ट्रेलर आडवा लावून रोड बंद करण्यात आला. या ठिकाणी ट्रेलर पोहचल्यावर  आरोपीने ट्रेलर थांबवून  त्यामधून  उडी मारून तो पळून जात असताना उपनिरीक्षक सुनील तारमळे, दिपक कादबाने,  गेजगे ( वाहतूक शाखा), खारघर पेालीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक अरुण पधर, महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे यांनी  बिकास जरनील सिंग यास  ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे