राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त खोपोलीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिळफाटा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १० जून १९९९ रोजीच्या स्थापनेपासून २१ वर्षे पूर्ण केली असून सध्या राज्य आणि देश कोरोना महामारीच्या संकटातून जात आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस

 शिळफाटा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १० जून १९९९ रोजीच्या स्थापनेपासून २१ वर्षे पूर्ण केली असून सध्या राज्य आणि देश कोरोना महामारीच्या संकटातून जात आहे.  यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करून स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने पक्षाचा वर्धापनदिन साजरा करावा. संपूर्ण वर्ष लोकसेवेसाठी अर्पण करावे, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कार्यकर्त्यांना सुचित केले असल्याचे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांनी सांगितले.संपूर्ण रायगड जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे ,रायगड जिल्हा पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव अभिप्राय उपक्रम राबविला जात आहे . 

या २१ वर्षाच्या कालखंडात पक्ष म्हणून मानवतेच्या संरक्षणासाठी आणि उद्धारासाठी आपल्या कोरोना महामारी मोठ्या संकटाला सामोरे जात असताना या विषाणूच्या विरोधात झगडताना आतापर्यंत३५०० हजारापेक्षा जास्त  लोकांनी राज्यातील जीव गमावला असल्याचे मसुरकर यांनी सांगितले आहे . डॉक्टर,नर्सेस, पोलीस ,सफाई कर्मचारी तसेच प्रशासकीय अधिकारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोणा विरुद्धची लढाई सक्षमपणे लढत असल्याचे ही पत्रकार परिषदेत पत्रकारांना दत्ताजीराव मसुरकर यांनी सांगितले . राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या आवाहनानुसार राज्यात सर्वत्रच पक्षाचा साधेपणाने वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरविले असून पक्षाने केलेल्या यशस्वी कामगिरीचा वर्धापन दिनानिमित्ताने मसुरकर यांनी आढावा सांगताना दोन दशकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार वेळा राज्यात सत्ता स्थापन केली.  ही महत्वपूर्ण बाब आहे राष्ट्रवादी पक्ष लोकशाहीच्या परंपरेत रुजलेला असून धर्मनिरपेक्ष, लोकशाही, सामाजिक न्याय आणि पुरोगामी विचाराचे प्रबळ समर्थक असल्याने महाराष्ट्र राज्याचा आधुनिक इतिहास राष्ट्रवादीच्या योगदानाने व आदर्शाने घडविला आहे. असे सांगताना मसुरकर यांनी पत्रकारांना असेही सांगितले की आपल्या देशाचा इतिहासात राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे की ज्याने स्थापनेच्या केवळ आठ महिन्यातच राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळविला आहे.  वीसवर्षातच चौथ्यांदा सरकार स्थापन केल्याचाही मसुरकर यांनी पत्रकारांना आवर्जून सांगितले.  
 
 खालापूर खोपोली शहरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन कोरोनाच्या महामारी संकटात सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात आणि प्रामुख्याने खोपोली शहरात अभिनव अभिप्राय उपक्रम राबवण्याचा कार्यकर्त्यांचा मानस असल्याने १८ जून रोजी लोहाना सभागृह खोपोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिना निमत्ताने शहरात सप्ताहभर अभिनव उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबवले जाणार असून पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला केलेली मदत ही कौतुकास्पद असल्याचेही मसुरकर यांनी सांगितले. आदिवासी अपंग व्यक्ती गरीब गरजूंना धान्य वाटपास मदत केली असल्याचे म्हटले . पत्रकार परिषदेच्या सुरुवातीस देशातील कोरोना मध्ये व नुकताच झालेल्या चीनच्या लढाईत मृत्यू पावलेला शाहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.  या पत्रकार परिषदेस खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन ताई औसरमल , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खोपोली शहराध्यक्ष मनीष यादव, राष्ट्रवादी  युवक शहराध्यक्ष पाटील अतुल पाटील व महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुवर्णा मोरे उपस्थित होत्या. शेवटी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अतुल पाटील यांनी उपस्थित पत्रकार यांचे आभार मानले.