आमदार गोपीचंद पडळकर यांचा पनवेल राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागातर्फे निषेध

पनवेल : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर यांच्या नेतृत्वाखाली

पनवेल : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे  जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. 

पनवेल खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राष्ट्रवादी ध्वजस्तंभाजवळ आज सकाळी ११ वाजता  राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे  जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी  गोपीचंद पडळकर यांनी प्रसार माध्यमासमोर जाहीर माफी मागावी. अन्यथा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा ही देण्यात आला. त्यानंतर पनवेल तहसीलदारांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधाचे पत्र देण्यात आले.

यावेळी  पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष  किशोर देवकर , जिल्हा उपाध्यक्ष हर्षद लोखंडे, जिल्हा सचिव गणेश पाटील ,जिल्हा सचिव अफ्रोज शेख,प्रभाग अध्यक्ष राहुल अढांगळे ,प्रभाग कार्याध्यक्ष मोहम्मद हरी शेख, प्रभाग उपाध्यक्ष अख्तर, प्रभाग सचिव अबु सालेम, नम्रता देवधेकर आणि पक्षाचे  पदाधिकारी उपस्थित होते