राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये झाले ध्वजारोहण

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आज खांदा कॉलनी, पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी

 पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आज खांदा कॉलनी, पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून  साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन असल्याने पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शारीरिक अंतर राखून निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खांदा कॉलनी पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष  किशोर देवधेकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजून १० मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सलग २० वर्षे न चुकता ध्वजारोहण होत आहे  या प्रसंगी राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष  हर्षद लोखंडे , जिल्हा सचिव गणेश पाटील,  जिल्हा सचिव  अफ्रोज शेख,  अशोक वाघ , नम्रता देवधेकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.