सरकारमध्ये पारदर्शकता राहिली नाही – आमदार रविंद्र चव्हाण

रोहा:रायगडसह कोकणामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. या नुकसानीमध्ये आंबा, काजू, सुपारी आणी नारळाच्या उत्पन्न देणाऱ्या बागा उद्ध्वस्त झाल्या. गेली अनेक वर्ष केंद्र आणी राज्य

 रोहा: रायगडसह कोकणामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. या नुकसानीमध्ये आंबा, काजू, सुपारी आणी नारळाच्या उत्पन्न देणाऱ्या बागा उद्ध्वस्त झाल्या.  गेली अनेक वर्ष केंद्र आणी राज्य सरकार ज्या पद्धतीची मदत देत त्या मदतीच्या बाहेर जाऊन राज्य शासनाने मदत देण्याची गरज आहे. महत्वाचे म्हणजे तातडीची मदतही आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसले नाही. मग ती निसर्ग चक्रिवादळात नुकसान झाल्याची असो वा कोरोनाशी झुंज देणाऱ्यारुग्णाच्या बाबतीत असो. या सरकारमध्ये पारदर्शकता राहिलेली नाही, असे विधान आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले. सोमवारी रोहा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे , अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, वैकुंठ पाटील, युवा अध्यक्ष अमित घाग, संजय कोनकर, मिलिंद पाटील, सोपान जांभेकर व पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, गेली २० ते २५ वर्षे अनेक पिढ्या कोकणातील शेतकऱ्यांच्या झाडांचे संगोपन करुन त्यावर उत्पन्न घेत आहेत. आता मात्र ही संगोपन केलेली झाडे जमीनदोस्त झाली आहेत. ती काढण्यासाठी शेतकऱ्यांना एका झाडाला शंभर रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. असे असले तरी कोकणाला सरकारने आजपर्यंत काही दिले नाही तरीही तो समाधानी राहिला आहे. आता मात्र यातून सावरायला शेतकऱ्यांसाठी आंबा, सुपारी नारळ काजुची झाडे देऊन या झाडांचे संगोपन करण्यासाठी एक योजना करणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे कोकणातील शेतकऱ्याला या संकटातून उभे करायचे असेल तर त्याला आता खरी मदतीची गरज आहे. निसर्ग संपन्न असणारा हा कोकण सरकारच्या कमी जास्त योजनांमुळे टिकून राहिला. आता मात्र पंचनामे झाले पाहिजेत. याजबरोबर महवितरणने जास्तीचे कामगार महाराष्ट्रातील सर्वच भागातून आणून रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, असे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना रविंद्र चव्हाण यांनी सुचित केले.

समाजसेवी संस्थानी व गावातील तरुणांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. कोकणातील लोक फार वेगळी आहेत. या संकटावर मात करुन आपले जीवन ते निश्चितच सुरळीत करतील. आता लाईट जवळजवळ १० ते १५ दिवस येणार नसल्याने आम्ही भाजपाच्या वतीने सौरदिवे, पत्रे आणी आदिवासी पाड्यांवर धान्याचे वाटप करणार असल्याचे आ.रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.  आज रायगड जिल्ह्यात आम्ही डोळ्यांनी पाहतोय एक लाखाच्या कितीतरी पटीने झाडांचे नुकसान झाले आहे. त्यावेळचे केंद्रातील व राज्यातील सरकार पारदर्शक होते. आता मात्र या सरकारमध्ये पारदर्शकता राहिली नाही. देशातील ८० कोटी लोकांना फायदा झाला पाहिजे. यानुसार केंद्रातून निधी देण्यात आला. मात्र अद्याप दोन हजार रुपये कित्येकांच्या खात्यात जमा झाले नाही. म्हणजेच सरकारमध्ये पारदर्शकता नाही असे स्पष्ट होते. 

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, रोहा, अलिबाग, मुरुड अद्याप पंचनामे झाले नसल्याने लोकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक झाडे काढण्यात व साफसफाई करण्यास थांबले आहेत. सदर परिस्थितीची पाहणी केली व या तालुक्यातील तहसिलदारांना पंचनामे करण्याचे सुचित केले. याशिवाय तातडीची मदत आता नुकसानग्रस्तांना मिळणे आवश्यक आहे.