रविंद्र कान्हेकर यांना राज्यस्तरीय आश्रम शाळा कर्तुत्ववान क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित

दोन वर्ष विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजन आणी विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा प्रकारात गडचिरोली आणी अमरावती येथे उज्ज्वल यश संपादन केले. त्यामुळे ठाणे विभागात त्यांचे नाव घेतले जात असून प्रकल्प अधिकारी शशिकला अहिराव यांनी ही त्यांना त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन केले.

रोहा : रोहा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव मधील क्रीडा शिक्षक रविंद्र कान्हेकर यांना राज्यस्तरीय आश्रम शाळा कर्तुत्ववान क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शनिवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांच्या वतीने आदिवासी आश्रम शाळा कर्तुत्ववान कर्मचारी सेवासन्मान २०२० देण्यात आला. आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी हेच दैवत माणून शिक्षणाच्या सार्वत्रिकिकरनासाठी व विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र झिजत राहिल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांच्या वतीने आदिवासी आश्रम शाळा कर्तुत्ववान क्रीडा शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.

शासकीय आश्रम शाळा सानेगाव येथे त्यांची सेवा सन २०१८ मध्ये सुरु झाल्यानंतर शैक्षणिक वर्ष २०१८- २०१९ व २०१९ -२० मध्ये कान्हेकर सर यांनी प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत सलग दोन वर्ष चॅम्पीयन ट्रॉफी हा किताब पटकावला. याशिवाय सतत दोन वर्ष विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजन आणी विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा प्रकारात गडचिरोली आणी अमरावती येथे उज्ज्वल यश संपादन केले. त्यामुळे ठाणे विभागात त्यांचे नाव घेतले जात असून प्रकल्प अधिकारी शशिकला अहिराव यांनी ही त्यांना त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना विचारणा केली असता प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव व मुख्याध्यापक मधुकर फसाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मी हे यश संपादन केले असे म्हणाले.

महत्वाचे म्हणजे रोहा तालुका स्तरीय पावसाळी स्पर्धेमध्ये स्पर्धा आयोजनात कान्हेकर सर यांचा मोलाचा वाटा असतो. याशिवाय गेली दहा वर्ष त्यांच्या सेवा कार्यकाळात त्यांनी रोहा, माणगाव, मुरुड येथील इंग्रजी माध्यमाच्या दांडगा अनुभव मिळवला. याच अनुभवमुळे त्यांना आदिवासी आश्रम शाळेतील स्पर्धा आयोजनात फायदा झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, शाळेचे मुख्याध्यापक मधुकर फसाळे, रायगड जिल्हा परीट समाज अध्यक्ष नंदकीशोर राक्षे, महाराष्ट्र राज्य परीट समाज उपाध्यक्ष शांताराम भाऊ कदम, प्रकाश पवार, रायगड प्रेस क्लबचे राजेंद्र जाधव, अनिसचे मारुती फाटक व सामाजिक आणी राजकिय स्तरातून रायगड जिल्ह्यात अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला व क्रीडा शिक्षक रविंद्र कान्हेकर यांना पुढिल वाटचाळीस शुभेच्छा देण्यात आल्या.