महसूल गुप्तचर संचलनालयाची ‘या’ जिल्ह्यात मोठे कारवाई; तब्बल ८७९ कोटीचे २९३ किलो अमली पदार्थ जप्त

आरोपींनी या हिरॉइनची तस्करी करत असताना, कागदोपत्री तुरटी आणि सुगंधी पावडरची वाहतूक करत असल्याचं दाखवलं होतं. पण महसूल गुप्तचर संचलनालयाच्या अधिकाऱ्यांचा संशय बळावल्यानं त्यांनी संबंधित मालाची पाहाणी केली. त्यानंतर २९३ किलोग्रॅम वजनाचं अमली पदार्थाचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे.

    रायगड: महसूल गुप्तचर संचलनालयाने (DRI) जिल्ह्यातील उरण येथील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) बंदरात कारवाई करत तब्बल ८७९ कोटी रुपये किमतीचे तब्बल २९३ किलो अमली पदार्थ जप्त केले आहे. अमली पदार्थांचा एवढा साठा अफगाणिस्तान ,इराणमार्गे भारतात आणल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात आणलेले हे अमली पदार्थ रायगडमधून पंजाबला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी DRI च्या अधिकाऱ्यांनी मुख्य आयातदाराला अटक केली असून अमली पदार्थाच्या तस्करीबाबत मोठं जाळं समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

    याप्रकरणी DRI च्या अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपींनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू केली आहे. संबंधित आरोपींनी यापूर्वीही या मार्गानं मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

    आरोपींनी या हिरॉइनची तस्करी करत असताना, कागदोपत्री तुरटी आणि सुगंधी पावडरची वाहतूक करत असल्याचं दाखवलं होतं. पण महसूल गुप्तचर संचलनालयाच्या अधिकाऱ्यांचा संशय बळावल्यानं त्यांनी संबंधित मालाची पाहाणी केली. त्यानंतर २९३ किलोग्रॅम वजनाचं अमली पदार्थाचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल८७९ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती DRI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.