कोविड रुग्णालयासंदर्भात संघर्ष समितीची आढावा बैठक

  • व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची व्यवस्था तसेच तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय, स्टाफ किती असावा, हे हॉस्पिटल उच्च दर्जाचे असावे, याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचवेळी या विभागात मोठ्या प्रमाणात सिडकोने या सुविधांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. सिडकोने या विभागात केवळ कोविडचा विचार न करता या ठिकाणी कायमस्वरूपी एम्सच्या धर्तीवर उरण, पनवेल परिसरातील गोरगरिबांसाठी सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करावे, अशी संघर्ष समितीतर्फे ठाम भूमिका मांडण्यात आली.

पनवेल : सिडकोमार्फत १० कोटी रुपये मंजूर केल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सिडकोच्या आधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत गुरुवार ३० जुलै रोजी कोविड हॉस्पिटल कसे असावे याबाबत चर्चा करण्यात आली.  या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोविड हॉस्पिटल कसे असावे याबाबत चर्चा करण्यात आली.साधारणतः २०० बेड्सचे हे हॉस्पिटल असेल. त्यामध्ये १५० बेड्स हे नॉर्मल असतील, तर ५० बेड्स स्पेशल असतील.

व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची व्यवस्था तसेच तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय, स्टाफ किती असावा, हे हॉस्पिटल उच्च दर्जाचे असावे, याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचवेळी या विभागात मोठ्या प्रमाणात सिडकोने या सुविधांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. सिडकोने या विभागात केवळ कोविडचा विचार न करता या ठिकाणी कायमस्वरूपी एम्सच्या धर्तीवर उरण, पनवेल परिसरातील गोरगरिबांसाठी सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करावे, अशी संघर्ष समितीतर्फे ठाम भूमिका मांडण्यात आली.           

या बैठकीला लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, समितीचे उपाध्यक्ष बबनदादा पाटील, समितीचे सचिव महेंद्र घरत, श्री साई देवस्थानचे विश्वस्त रवींद्र पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गिरीष गुणे आणि त्यांचे सहकारी आणि सिडको अधिकारी उपस्थित होते.