Rickshaw driver rapes tourist girl in Mumbai

नाताळ व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी छत्तीसगढ येथील १८ वर्षीय तरुणी मुंबईत एकटीच फिरण्यासाठी आली होती. यावेळी एका रिक्षाचालकाने तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला.

पनवेल :  तरुणींनी सोलो ट्रीप करायच्याच नाहीत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करणारी घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत आलेल्या पर्यटक तरुणीवर पनवेलमध्ये रिक्षाचालकानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नाताळ व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी छत्तीसगढ येथील १८ वर्षीय तरुणी मुंबईत एकटीच फिरण्यासाठी आली होती. यावेळी एका रिक्षाचालकाने तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला.

२२ डिसेंबर रोजी ही तरुणी पश्चिम एक्सप्रेसने वांद्रे रेल्वे स्थानकावर उतरली. ती एकटी असल्याचे पाहून टीसीने तिला चाइल्ड हेल्पलाइनच्या ताब्यात दिले. चौकशी तिला सोडण्यात आले. यानंतर ती पनवेलला गेली.

२७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या तिने पनवेल रेल्वे स्थानकाजवळून रिक्षा थांबवली. तरुणी एकटीच असल्याची संधी साधून रिक्षाचालकाने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर रिक्षाचालक फरार झाला.

या प्रकारानंतर तरुणीने पनवेल शहर पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. पनवेल शहर पोलिसांनी १२ तासांत आरोपीला अटक केली.