खांदा काॅलनीत खोदलेले रस्ते ठरतात त्रासदायक; शिवसेनेचा हल्लाबोल त्वरित उपाययोजना करा

खांदा कॉलनीमध्ये महानगर गॅस पाईपलाईन साठी खोदण्यात आलेले रस्ते नागरिकांसाठी व वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत होते. म्हणून शनिवारी कार्यसम्राट शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगर गॅसपाईपलाईन अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्त्याची डागडुजी करून घेतली खांदा काॅलनीत महानगर गॅसकपनी पाईप लाईनसाठी रस्ते खोदल्या नंतर माती तशीच रस्त्यावर बरेच दिवस पडून असते.

नवी मुंबई (Navi Mumbai).  खांदा कॉलनीमध्ये महानगर गॅस पाईपलाईन साठी खोदण्यात आलेले रस्ते नागरिकांसाठी व वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत होते. म्हणून शनिवारी कार्यसम्राट शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगर गॅसपाईपलाईन अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्त्याची डागडुजी करून घेतली खांदा काॅलनीत महानगर गॅसकपनी पाईप लाईनसाठी रस्ते खोदल्या नंतर माती तशीच रस्त्यावर बरेच दिवस पडून असते.

परिसरात वाहतूक कोंडी होते तसेच अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे काम झाल्यावर लगेच खड्डे भरून घ्यावेत तसेच लोकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने काम करावे अशी सूचना खांदा काॅलनी शिवसेना प्रतिनिधी मंडळाने महानगर गॅसकपनीला केली. त्या सूचनेची लगेचच अंमलबजावणी केली. त्यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख संपत सुवर्णा, युवासेना उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि युवासैनिक उपस्थित होते.