वादळग्रस्तांच्या मदतीसाठी श्रीवर्धनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे पथक दाखल

श्रीवर्धन : निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्याला व शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. तालुक्यातील ९५ टक्के घरे मोडली असून अनेकांची छपरे उडून गेली आहेत तर अनेकांच्या भिंतीदेखील कोसळल्या आहेत.

श्रीवर्धन : निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्याला व शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. तालुक्यातील ९५ टक्के घरे मोडली असून अनेकांची छपरे उडून गेली आहेत तर अनेकांच्या भिंतीदेखील कोसळल्या आहेत. घराच्या आवारामध्ये झाडे पडल्यामुळे मागील दारी जाण्यास देखील रस्ता शिल्लक नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्रीवर्धन यांच्यावतीने अशा परिसराची पाहणी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा कार्यवाह यांना ही गोष्ट कळविण्यात आली होती. त्यानंतर महाड येथून व जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून अनेक स्वयंसेवक श्रीवर्धनमध्ये दाखल झाले आहेत. या स्वयंसेवकांनी आपल्याबरोबर येताना नागरिकांना वाटण्यासाठी मेणबत्त्या आणलेलल्या आहेत. त्याचप्रमाणे कोयत्या, फरशी, कुऱ्हाड घेऊन झाडे तोडण्यासाठीदेखील एक पथक दाखल झाले आहे. तसेच ८ झाडे कापण्याची मशीनसुद्धा या ठिकाणी देण्यात आली असून स्वयंसेवकांनी अनेक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची झाडे कापून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. श्रीवर्धनच्या र.ना. राऊत विद्यालयाच्या प्रांगणात या स्वयंसेवकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या नागरिकांचे पत्रे तुटले आहेत अशा नागरिकांसाठी स्वस्त दरामध्ये पत्रदेखील उपलब्ध केले जाणार आहेत. या सर्व मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रीवर्धन तालुका कार्यवाह कुणाल सावंत,स्वयंसेवक सुयोग चौगुले, नंदकुमार चितळे, श्रेयस पेंडसे, सुशील सावंत, अजिंक्य पिसाट यासह अनेक स्वयंसेवकांनी खूप मेहनत घेतली आहे.