अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एस. टी. बसचालकाचा कशेडी बंगला येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पोलादपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महामार्गावरील कशेडी बंगला येथे सेवा बजावत असताना नितीन नलावडे या एस. टी. बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ६.

 पोलादपूर :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महामार्गावरील कशेडी बंगला येथे सेवा बजावत असताना नितीन नलावडे  या एस. टी. बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ६. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. नितीन नलावडे  आपल्या ताब्यातील एसटी बस घेवून कशेडी वाहतूक पोलीस केंद्रानजीकच्या तपासणी नाक्याजवळ गेले होते. या ठिकाणी मुंबईहून गावी परतणाऱ्या चाकरमान्यांना रोखण्यात येत असून या नागरिकांना लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात एसटी बसने पोहचवण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सकाळच्या सुमारास अचानक त्यांची तब्येत खालावल्याने तातडीने उपचारार्थ कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १ वर्षांपूवी एसटी महामंडळाच्या सेवेत रुजू झालेल्या नितीन नलावडे यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने भरणे परिसरावर शोककळा पसरली आहे.