खांब-कोलाड विभागातील साखरचौथ गणेशोत्सव सोहळा

साखरचौथ गणरायाचे वाजतगाजत आगमन झाल्यावर मोठ्या भक्तिभावाने पुजन व महाआरती करण्यात आली. तसेच या दिड दिवसाचे उत्सवात हरिपाठ,जागर भजन व अन्य धार्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात येत आहेत.

रोहा : अनंत चतुर्थीला दहा दिवसांचे विसर्जन केल्यानंतर आज साखरचौथ गणेशोत्सव अंतर्गत खांब-कोलाड विभागात घरगुती तसेच सार्वजनिक स्वरुपात या दिवसाला मोठ्या भक्तीभावाने गणरायांचे आगमण करून उत्सव साजरा करण्याची फार मोठी परंपरा लाभली आहे.

आज साखरचौथ गणरायाचे वाजतगाजत आगमन झाल्यावर मोठ्या भक्तिभावाने पुजन व महाआरती करण्यात आली. तसेच या दिड दिवसाचे उत्सवात हरिपाठ,जागर भजन व अन्य धार्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात येत आहेत. खांब विभागातील विविध गावामध्ये सार्वजनिक व घरगुती स्वरूपात हा दीड दिवसांचा उत्सव साजरा केला जात आहे. सध्या कोरोना व्हाईरसमुळे सर्वच सण व उत्सव साजरे करण्यासाठी शासकीय नियमानुसार साजरे करावे लागत आहेत.नुकतेच दहा दिवसांचा गणेशोत्सवही शासकीय नियमानुसार साजरा करण्यात आला. त्याच धर्तीवर साखरचौथ गणेशोत्सव देखील शासकीय नियमानुसार व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा केला जात आहे.