श्रीवर्धन तालुक्यात सिमेंटचे पत्रे, कौले व लोखंडी हुक यांची चढ्या भावाने विक्री, प्रशासनाला कारवाई करण्याची मागणी

अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीवर धडकले आणि श्रीवर्धन तालुक्यामध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये कौलारू घरे सिमेंट पत्र्याचे घर, त्याचप्रमाणे पत्रा

अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीवर धडकले आणि श्रीवर्धन तालुक्यामध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये कौलारू घरे सिमेंट पत्र्याचे घर, त्याचप्रमाणे पत्रा शेड, पंप केबिन इत्यादींचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. प्रत्येक नागरिकाला आपले घर दुरुस्त करण्यासाठी सिमेंटचे पत्रे, कौले किंवा सिमेंटचे पत्रे फिक्स करण्यासाठी लोखंडी हूक यांची प्रचंड आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे अनेकांचे पाण्याचे पीव्हीसी पाईप देखील उडून गेल्यामुळे या पाइपची देखील आवश्यकता आहे.

मात्र अनेक व्यापारी या वस्तूंचा धंदा करतात ते मालाचा स्टॉक उपलब्ध नसल्याचे कारण सांगून चढ्या दराने मालाची विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे. श्रीवर्धन शहरातील काही व्यापारी जे दुसरा धंदा करतात अशा व्यापाऱ्यांनी नागरिकांना सिमेंट पत्रे उपलब्ध व्हावे या हेतूने कोणताही नफा कमावण्याच्या अपेक्षा न ठेवता आलेल्या भावाने पत्रे विक्रीसाठी आणले होते. परंतु अशा व्यापार्याेवरती देखिल चढ्या भावाने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आक्षेप घेण्याचा प्रकार श्रीवर्धन शहरांमध्ये घडला. मात्र जागरूक नागरिकांनी सदर चेकिंग साठी आलेल्या लोकांना पळून लावले.

श्रीवर्धन तालुक्यामध्ये बिल्डिंग मटेरियल चा व्यवसाय करणारे अनेक व्यापारी आहेत यांच्या वरती आता महसूल प्रशासनाने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. चढ्या भावाने विक्री करणाऱ्या अशा व्यापाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.