महाडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरुच ; १५ हजाराचा साठा जप्त

महाड (Mahad) शहरातील सरेकर आळी मधील किराणा मालाचे व्यापारी यांनी आपल्या दुकानात तंबाखूजन्य (Sales of tobacco products ) पदार्थाचा साठा (stocks ) विक्री करण्याच्या हेतूने विनापरवाना केल्याचे आढळून आल्याने महाड शहर पोलिसांनी (Police) हा बेकायदेशीर रित्या ठेवलेला तंबाखूजन्य वस्तुंचा साठा जप्त करून त्या व्यापार्या्विरोधात कारवाई केली आहे.

महाड : महाड (Mahad) शहरातील सरेकर आळी मधील किराणा मालाचे व्यापारी यांनी आपल्या दुकानात तंबाखूजन्य (Sales of tobacco products ) पदार्थाचा साठा (stocks ) विक्री करण्याच्या हेतूने विनापरवाना केल्याचे आढळून आल्याने महाड शहर पोलिसांनी (Police) हा बेकायदेशीर रित्या ठेवलेला तंबाखूजन्य वस्तुंचा साठा जप्त करून त्या व्यापार्या्विरोधात कारवाई केली आहे. या व्यापाऱ्यांच्या दुकानात यापूर्वीही छापा टाकून अशा रितीने बेकायदा केलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. शासनाने तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व साठा करण्यास बंदी घातली आहे परंतु महाड शहरात सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात असल्याचे दिसत आहे.

महाडमधील व्यापाऱ्यांना तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांच्या मागावर पोलिस यंत्रणा होती. महाड शहरातील सरेकर आळी मधील समीर पारेख या व्यापाऱ्याचे दुकानात तंबाखूजन्य पदार्थ हे मानवी आरोग्यास अपायकारक आहेत व त्यावर महाराष्ट्र शासनाने अधिसूचना व्दारे साठा करण्यास प्रतिबंध केला आहे हे माहित असतानाही तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदेशीर रित्या साठा करण्यात आला असल्याची गुप्त खबर पोलिसांना लागली.

दि १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा चे दरम्यान समीर किराणा स्टोअरमध्ये छापा टाकून या दुकानातून केसरयुक्त विमल पान मसालाची १०१ पाकीट ( रु १२१२०/-) व्ही एन तंबाखूजन्य पदार्थाची लाल रंगाची १०७ पाकीटे (रु ३२०१/-) व्ही एन तंबाखू जन्य पदाथाची हिरवी काळ्या रंगाची १३ पाकीटे ( रु ४२९/-) असा एकुण १५७५९/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला समीर किराणा स्टोअर चे मालक समीर पारेख यांचे विरोधात गुन्हा रजि नंबर ९३/ २० भादंवि कलम१८८,२७३,३२८ सह अन्न सुरक्षा व मानवे ( प्रोव्हीबिशन अॅन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल ) विनियम २०११ चे विनियम २,३,४ सह अन्न सुरक्षा व मानवे ( फूड प्रॉडक्ट स्टॅडर्ड अँन्ड फुड अँडीटिव्हीज) विनियम २०११ चे विनियम३,१,७ सह अन्न सुरक्षा मानवे कायदा २००६ चे कलम २६ (१ ) २६(२)(I)(IV)२७(३)(e)२७(३)(d) शिक्षा कलम ५९ अन्वये दाखल करण्यात आला आहे.