पनवेलचे ‘ब’ प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून रुग्णवाहिका खरेदीचा केला संकल्प

पनवेल : कोरोनाच्या विरोधात संपूर्ण जग लढा देत असल्याने पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती 'ब' चे सभापती संजय भोपी यांनी या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे . या खर्चातून खांदा वसाहतीतील

पनवेल : कोरोनाच्या विरोधात संपूर्ण जग लढा देत असल्याने पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे . या खर्चातून खांदा वसाहतीतील रहिवाशांसाठी एक रुग्णवाहिका खरेदी करण्याचा संकल्प त्यांनी आपल्या  जन्मदिनी केला. लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही. या स्तुत्य उपक्रमाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कौतुक केले आहे.

सध्या कोरोनाचे रोगाचे जागतिक  संकट सुरू आहे. याविरोधात संपूर्ण जग लढा देत आहे. त्याला पनवेल आणि खांदा वसाहत सुद्धा अपवाद नाही. दरम्यान या संकटामुळे आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांची नितांत गरज आणि आवश्यकता भासत आहे.  कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंब आर्थिक दृष्ट्या पेचात  सापडलेले आहे. एकीकडे कोरोना  रोगाचे संकट. आणि दुसरीकडे कमालीची आर्थिक मंदी या गोष्टींमुळे अतिशय विदारक स्थिती सध्या दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांनी आपला  वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला . आज कोणताही अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला नाही. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी केक तसेच स्नेहभोजन या सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. वाचलेला हा खर्च आणि त्यामध्ये आणखी पैसे टाकून खांदा वसाहतीतील रहिवाशांसाठी रुग्णवाहिका घेऊन ती लोकार्पण करण्याचा संकल्प भोपी यांनी केला. ही सेवा येत्या काही दिवसात वसाहतीसाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे संजय भोपी प्रतिष्ठान कडून सांगण्यात आले. याव्यतिरिक्त अलर्ट सिटीझन फोरम मॉर्निंग योगा ग्रुप यांचेही सहकार्य लाभणार आहे.

 स्थानिक रहिवाशांना रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी संजय भोपी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णवाहिका खरेदी केली जाणार आहे. नागरिकांना ही रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिली जाईल. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवला जात आहे. माझा वाढदिवस यावर्षी साजरा न करता रुग्णवाहिकेला प्राधान्य देण्याचा मनोमन विचार केला.-  संजय भोपी , सभापती प्रभाग समिती ‘ब’ , पनवेल