कोकणातील प्रसिद्ध असलेले कलगी तुरा नाच मंडळावर कोरोनाची संक्रात

कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोऱ्यात रसिक प्रेक्षकांना मंत्र मुग्ध करणारे कलगी तुरा नाच मंडळ व गायक शाहिरांची शाहीरी तसेच विविध प्रकारची अंगी असलेली कला तसेच सदरच्या गाण्यांमधून समाज्याला प्रबोधन इत्यादी सादर करण्याची कला ही कलगी तुरा नाच मंडळातच आहे

सुतारवाडी – आपल्या महाराष्ट्राने सांस्कृतिक कला मोठ्या प्रमाणावर जपली आहे. अनेक कलांपैकी कलगी तुरा हा एक महत्वाचा असा भाग. कोकणात कला सांस्कृतिक मंडळ व कलगी तुरा उन्नती नाच मंडळ कला तसेच रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारे लोककला शाहीर व कलावंत कलाकारांना गणेशोत्सव व नावरात्रौ उसत्व दरम्यान आपली कला सादर करण्यासाठी मोठी मागणी असते परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यांच्या नाच गाण्यांवर पूर्णतः बंदी असल्यामुळे कला रसिकप्रेमी यांच्या चेहऱ्यावरील आनंद हरपल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे या उसत्व काळात आपली कला रसिकांसमोर सादर करून मिळणाऱ्या पैशातून वर्षभर आपले कुटूंब चालवणाऱ्या कलाकारांवर कोरोना संकटामुळे मोठी उपास मारीची वेळ आली आहे.

कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोऱ्यात रसिक प्रेक्षकांना मंत्र मुग्ध करणारे कलगी तुरा नाच मंडळ व गायक शाहिरांची शाहीरी तसेच विविध प्रकारची अंगी असलेली कला तसेच सदरच्या गाण्यांमधून समाज्याला प्रबोधन इत्यादी सादर करण्याची कला ही कलगी तुरा नाच मंडळातच आहे. या कलेतील खरे काव्य रचना म्हणजे कलगी तुऱ्यातील टोमणा व गौळण या गाण्यांकडेच सर्व रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते की नवी चाल त्याला ढोलकीवाद्य साथ आणि घुंगरांचा आवाज विवीध पोशाखाने नटलेले कलावंत आपली कला सादर करतात याचा खरा थरार म्हणजे कोकणातील कलगी तुरा आदिशक्ती कलगीचे पट्टे गुरुवर्य वस्ताद कै तुकाराम अमृस्कर तर अखंड हरदासवळी तुरेवाले पट्टे गुरुवर्य वस्ताद बाळाराम यांच्या शिष्यांची गायन शाहिरी कलगी तुरा व भेदीका कला व नाच मंडळ या कलेतून मंत्रमुग्ध व आनंददायी होऊन जाणारा रशिकप्रेशक यांची नाराजी तर कलावंतांवर उपास मारीची वेळ इतिहासात प्रथच कोरोना संकटामुळे आली आहे.

कोकणातील रत्नागिरी रायगड ठाणे सह मुबंईतील कलामंच व नाट्य गृह कलगी तुरा नाचाच्या कलेतून गाजवून सोडणारे कलगी तुरा व भेदीकाचे शाहीर रसिकप्रेक्षकांना आपल्या नाच गाण्यातून मंत्र मुग्ध करून सोडणारी कला आज कोकणातील ग्रामीण भागातील खेडोपाडी चालत आलेली नाच गाण्यांची परंपरा कोरोनाच्या संकटात त्यामुळे रशिकप्रेक्षक नाराज तर सादर करणारे कलाकार व शाहीर यांच्यावर आर्थिक संकट आले आहे.