panvel santosh shetty

पनवेल  : पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे संतोष शेट्टी व महिला व बालकल्याण सभापतीपदी भाजपाच्या मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

पनवेल  : पनवेल(panvel) महापालिकेचे स्थायी समिती(standing committee) सभापतीपदी भाजपचे संतोष शेट्टी(santosh shetty) व महिला व बालकल्याण सभापतीपदी भाजपाच्या मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या अ,ब,क,ड या चारही विषय समितीच्या सभापतींचा कार्यकाळ१५ एप्रिल रोजी संपुष्टात आला होता. कोविडमुळे चारही सभापतींना मुदतवाढ मिळाल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या निवडणुकीमध्ये सत्तधारी भाजपतर्फे स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवक संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी नगरसेविका मोनिका महानवर, तर प्रभाग समिती अ साठी अनिता पाटील, प्रभाग समित ब साठी नगरसेवक समिर ठाकूर, प्रभाग समिती क साठी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती ड साठी नगरसेविका सुशील घरत यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिकेचे सचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे सोमवारी सादर केले होते. शेकाप तर्फे प्रभाग अ साठी विष्णु जोशी व प्रभाग ब साठी गोपाळ भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

आज घेण्यात आलेल्या निवडणूकीत स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपचे नगरसेवक संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी भाजपाच्या नगरसेविका मोनिका महानवर यांची बिन विरोध निवड झाली तर प्रभाग समितीच्या सभापतीपदी प्रभाग क हेमलता म्हात्रे आणि प्रभाग ड सभापतीपदी सुशील घरत यांची बिन विरोध निवड झाली . प्रभाग अ मध्ये भाजपच्या अनीता पाटील यांनी शेकापक्षाचे उमेदवार विष्णु जोशी यांचा १३ विरुध्द १० असा पराभव केला तर प्रभाग ब मध्ये भाजपच्यासमीर ठाकुर यांनी शेकापक्षाचे गोपाळ भगत यांचा १४ विरुध्द ९असा प्रभाव केला. विजयी उमेदवारांनी लोकनेते राम शेठ ठाकूर , आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट घेतली असता त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल , महिला मोर्चा तालुका अध्यक्षा व पंचायत समिति सदस्या रत्नाताई घरत माजी प्रभाग समिती अध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित होते.