savitri river

कारखान्यांनी पुन्हा आपले प्रदूषणाचे रंग उधळण्यास प्रारंभ केल्याने सावित्री नदीचे (Pollution In Savitri River)पाणी पुन्हा लाल रंगाने माखले आहे. नदी पात्रालगतच्या गावांमध्ये यामुळे संताप व्यक्त होत आहे.

    महाड : महाड (Mahad)औद्योगिक वसाहतीमधील(MIDC) कारखान्यांनी पुन्हा आपले प्रदूषणाचे रंग उधळण्यास प्रारंभ केल्याने सावित्री नदीचे (Pollution In Savitri River)पाणी पुन्हा लाल रंगाने माखले आहे. नदी पात्रालगतच्या गावांमध्ये यामुळे संताप व्यक्त होत आहे.

    प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने ( सीईटीपी ) हे प्रकार त्वरीत थांबविले नाहीत तर येत्या काही दिवसांत उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि शिरगांवचे सरपंच सोमनाथ उर्फ सचिन ओझर्डे यांनी दिला आहे.

    लाल रंगाचे रासायनिक पाणी आज पुन्हा सावित्री नदीपात्रात सोडल्याचे आढळून आले. महिना भरापूर्वी देखील असा प्रकार घडला होता. त्यावेळेस एका बंद कारखान्याच्या आवारातील रासायनिक घनकचऱ्याचे हे पाणी असल्याचे समोर आले. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्यावर बंदची कारवाई केली होती. मुळातच बंद असलेल्या कारखान्यावर बंदची कारवाई करण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका विनोदाचा विषय ठरली आहे.

    brown water

    आज पुन्हा सावित्री नदीच्या पात्रातील पाणी लालभडक रंगाचे झाल्याचे आढळून आले. त्यानंतर मात्र नदीपात्रालगतच्या गावांमध्ये संताप उसळला आहे. या संतापाला शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी वाचा फोडली आहे. पात्रात लाल रंगाचे हे जे पाणी मिसळते त्याला सीईटीपीचा बेजबाबदार आणि निष्क्रियपणाच कारणीभूत असल्याचा थेट आरोप ओझर्डे यांनी केला आहे. सीईटीपीचे चेअरमन संभाजी पाठारे यानी या प्रकरणी तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा सीईटीपीविरोधात तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.