तळा तालुक्यात सापडला कोरोनाचा दुसरा रूग्ण, प्रवास केलेल्या व्यक्तींपासून ६ फुटांचे अंतर ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन.

तळा : देशभरासह राज्यात गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाचे वादळ घोंघावत आहे. दक्षिण रायगडमध्ये श्रीवर्धन, पोलादपूर, महाड, माणगाव, रोहा, नंतर आता तळा तालुक्यात कोरोनाने शिरकाव केलेला आहे. तळा तालुक्यातील

तळा : देशभरासह राज्यात गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाचे वादळ घोंघावत आहे. दक्षिण रायगडमध्ये श्रीवर्धन, पोलादपूर, महाड, माणगाव, रोहा, नंतर आता तळा तालुक्यात कोरोनाने शिरकाव केलेला आहे. तळा तालुक्यातील तळेगावच्या रूग्णानंतर चरई (बु) येथे ३८ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चरई (बु) येथील ३८ वर्षीय व्यक्ती मुलुंडमधून १४ मे रोजी आपल्या पत्नीसह ३ कुटुंबातील ६ व्यक्तींसोबत चरई (बु) येथे खाजगी गाडीने आला होता. त्या सर्व कुटुंबाना उसर हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते.  त्यानंतर २१ मे ला या व्यक्तीला ताप आला असल्याने त्यास माणगाव येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी या व्यक्तीचे स्वॅब एम जी एम पनवेल येथे पाठविण्यात आले असता २३ मे रोजी या व्यक्तीचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. उर्वरित ७ व्यक्तींना उसर हायस्कूलमध्ये क्वाारंटाईन करण्यात आले असून त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. या ७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आज एम जी एम पनवेल येथे पाठविण्यात येणार आहेत. तळा प्रशासनाच्या प्रसंगावधानामुळे पाॅझिटीव्ह व्यक्ती ७ व्यक्तींशिवाय कोणाच्याही संपर्कात आली नसल्याने कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. पुणे,मुंबई सारख्या शहरातून प्रवास केलेल्या व्यक्तींपासून ६ फुटांचे अंतर ठेवण्याचे आवाहन तळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. उसर येथील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील शाळेत ठेवण्यात आलेल्या सर्व लोकांची व्यवस्थित काळजी घेत आहेत. घरी रहा, सुरक्षित रहा , काळजी घ्या व प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले आहे.