पनवेल महापालिकेची स्वत:ची कोरोना तपासणी लॅब असावी – किरीट सोमय्यांनी आयुक्तांना दिली सूचना

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मुंबईहून रिपोर्ट येण्यास लागणारा वेळ पाहाता पनवेल महापालिकेची स्वतःची कोरोनाची तपासणी लॅब असावी अशी सूचना भाजपचे माजी खासदार किरीट

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मुंबईहून रिपोर्ट येण्यास लागणारा वेळ पाहाता पनवेल महापालिकेची स्वतःची कोरोनाची तपासणी लॅब असावी अशी सूचना भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज एमजीएम कामोठे रुग्णालय, इंडिया बुल आणि महापालिकेला भेट देऊन रुग्णांवर सुरु असलेल्या उपचारासंदर्भात व्यवस्थेचा आढावा घेतल्यावर आयुक्तांशी चर्चा करताना केली.

कोविड – १९ संसर्ग असलेल्या रुग्णांवर कामोठे एमजीएम येथे उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर कोन गावाजवळील इंडिया बुल येथे क्वारंटाईन सेंटर आहे. या ठिकाणी माजी खासदार किरीट सोमैय्या, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत महापौर कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन येथील व्यवस्थेची पाहणी केली तसेच  रुग्णांना औषधे, भोजन वेळेवर देण्याबरोबर रुग्णांची योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना यावेळी तेथील वैद्यकीय तज्ञ् व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यानंतर या लोकप्रतिनिधींनी महापालिकेला भेट देऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात चर्चा केली. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचीसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना संदर्भात रुग्ण तपासणीचा अहवाल येण्यास वेळ लागत आहे तसेच तेथील यंत्रणेवर भार पडत आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीत पनवेलची स्वतःची तपासणी लॅब असावी, अशी सूचना किरीट सोमैया यांनी यावेळी आयुक्तांकडे केली.