महाड एम.आय.डी.सी.ची सांडपाणी वाहिनी फुटली, स्थानिक नागरिक त्रस्त

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी राजेवाडी गावाजवळ फुटल्याने रस्त्यालगत असलेल्या गटारात हे सांडपाणी तुंबून राहिले. महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या यांत्रिक

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी राजेवाडी गावाजवळ फुटल्याने रस्त्यालगत असलेल्या गटारात हे सांडपाणी तुंबून राहिले. महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या यांत्रिक विभागाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

महाड एम.आय.डी.सी.मधील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी ओवळे गावाजवळ खाडीत सोडले जाते. ही सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी आज सकाळी राजेवाडी गावाजवळ लिकेज झाल्याने रासायनिक सांडपाणी रस्त्यालगत असलेल्या गटारात साचून राहिले. महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या यांत्रिकी विभागाने दुरुस्तीचे काम तात्काळ हातात घेण्यात आले. गटारात तुंबून राहिलेले पाणी टँकरमध्ये उचलून नेण्यात आले. दरम्यान सातत्याने फुटणाऱ्या या पाईपलाईनमुळे या परिसरातील शेतकऱ्यांना कायम नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्याने हे काम ठप्प झाले आहे. रासायनिक सांडपाणी गटारात आल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.