नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणे गरजेचे – शरद पवार

म्हसळा :रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई नुकसानग्रस्तांना शासनाकडून मिळाली पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांनी रायगड

 म्हसळा : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई नुकसानग्रस्तांना शासनाकडून मिळाली पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांनी रायगड जिल्हा दौऱ्यावर असताना आज म्हसळा तालुक्यात व्यक्त केले. म्हसळा एसटी स्टँड येथे खासदार शरद पवार यांनी नुकसानग्रस्त काही नागरिकांची व अधिकारी वर्गाची भेट घेतली. यावेळी वादळामुळे झालेल्या नुकसानीची अनेकांनी लेखी निवेदने दिली.  जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याची विनंती खासदार शरद पवार यांना केली. 

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीने नागरिकांनी खचून न जाता या संकटाला धैर्याने सामोरे जाऊन आलेल्या संकटावर मात केली पाहिजे, असे सांगून तालुक्यात निसर्ग चक्री वादळाने झालेल्या घरांचे नुकसान, आंबा, नारळ, सुपारी यांसह इतर फळबागांचे नुकसान, मच्छीमारांचे नुकसान, आरोग्य यंत्रणा, वीज वितरणचे नुकसान, शासकीय इमारती, अशा सर्व नुकसानीबाबत खासदार शरद पवार यांनी आढावा घेतला. या सर्व नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून शासनाला सादर करावेत, अशा सूचनादेखील त्यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला केल्या. यावेळी खासदार शरद पवार यांच्या समावेत रायगडचे खासदार सुनिल तटकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांसह जिल्हा परिषद कृषी सभापती, तालुका सभापती, स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.