शिवसैनिकांनी केली पनवेलच्या आयुक्तांना हटविण्याची मागणी

पनवेल : पनवेल(panvel) महापालिकेचे आयुक्त(commissioner) सुधाकर देशमुख(sudhakar deshmukh) यांच्या बदलीची मागणी(demand of transfer) करून त्या ठिकाणी आयएएस दर्जाच्या सनदी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी शिवसैनिकांनी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पनवेलच्या कोव्हिड -१९ उपजिल्हा रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून पनवेल परिसरातील खाजगी डॉक्टरांनी आपली सेवा देणे बंद केले आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड -१९ रुग्णांना अत्यंत त्रास व गैरसोय सहन करावी लागत आहे. उपचाराअभावी अनेकांना खाजगी रुग्णालयात स्थलांतरित व्हावे लागत आहे. पनवेल कोव्हिड -१९ रुग्णालयात या क्षणी १०० रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असून १० व्हेंटिलेटर बेडही रुग्णांनी भरलेले आहेत. ज्या कोव्हिड -१९ रुग्णांना मधुमेह किंवा इतर जुने आजार आहे ज्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे, अशा रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची सेवा मिळत नसल्याने अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या देशात व राज्यात नॅशनल डिझास्टर कायदा लागू असून पनवेल महापालिका क्षेत्रातील खाजगी डॉक्टर राज्य शासनाच्या आदेशाला जुमानत नाही हेच स्पष्ट होत आहे. अशा परिस्थितीत पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना शासनाने पनवेल क्षेत्रातील कोरोना नियंत्रित आणण्यासाठी विशेषाधिकार दिलेले असूनही त्यांनी संबंधित डॉक्टरांना फक्त नोटिसा दिल्या आहेत आणि ते गप्प बसले आहेत.

अशा स्थितीत राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन ज्या ज्या ठिकाणी खाजगी डॉक्टर सेवा देत नाही त्या प्रत्येक ठिकाणी अंतर्गत कठोर कारवाई करावी. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी अपयशी ठरलेल्या आयुक्त सुधाकर देशमुख यांना अन्यत्र पाठवून त्या ठिकाणी आयएएस दर्जाच्या सनदी अधिकाऱ्याची नेमणूक करून अत्यवस्थ कोव्हिड -१९ रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी विष्णु गवळी यानी केली आहे. उपशहर प्रमुख महेश खैरनार, नागर गी रेमांत यानी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पुढाकाराने हे निवेदन मंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आले.