ravi rana and shivsena leader

एका फेसबुक लाईव्हमध्ये (Ravi Rana Criticized Chif Minister Uddhav  Thakre) बोलत असताना रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केले होते.रवी राणा यांनी केलेल्या टीकेला नवीन पनवेल शिवसेना उपविभागप्रमुख प्रशांत जाधव(Prashant Jadhav) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

    पनवेल: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddha Thakre) यांच्यावर सातत्याने टीका करणारे अमरावती(Amravati) जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा हे सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहतात. मात्र आज एका फेसबुक लाईव्हमध्ये (Ravi Rana Criticized Chif Minister Uddhav  Thakre) बोलत असताना रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केले होते.

    रवी राणा यांनी केलेल्या टीकेला नवीन पनवेल शिवसेना उपविभागप्रमुख प्रशांत जाधव(Prashant Jadhav) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

    प्रशांत जाधव यांनी म्हटलं आहे की, ”रवी राणा तुझी लायकी काय आणि तु बोलतो किती कोण आहे हा रवी राणा आम्ही ओळखतं नाही असल्या फालतू लोकांना आम्ही किंमत देत नाही स्वतःला मोठं करण्यासाठी अशी काही मंडळी आपल्या नेत्यांच्या समोर सत्ताधाऱ्यांवर टीका टिप्पणी करत असतात. अशा लोकांना आम्ही जास्त महत्त्व देत नाही. यापुढे रवी राणांनी आपल्या लायकी मध्ये राहावे .”

    ”या बाटग्यांनी सरकारवरती बोलावे किंवा सल्ले द्यावेत हा विनोदच म्हणावा लागेल कुणीतरी एक बोगस रवी राणा पुढे करून सरकार वरती भुंकत आहे .कोण कुठले हे राणा या पुढे तोंड सांभाळून वापरा अन्यथा शिवसैनिक थोबाड फोडतील.” असा इशाराही प्रशांत जाधव यांनी दिला आहे.