
म्हसळा :रायगड जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी खचून न जाता धीराने पुन्हा उभे राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर
म्हसळा : रायगड जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी खचून न जाता धीराने पुन्हा उभे राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते तथा म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी म्हसळा येथे आढावा सभेत बोलताना केले आहे.
म्हसळा तालुक्यातील संपूर्ण गावांचा वीजपुरवठा चालू होण्यासाठी आणखी पंचवीस दिवस लागणार, अशी माहिती म्हसळा उपविभागीय अधिकारी वानखेडे यांनी म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी घेतलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिली. यावेळी कामासाठी आलेले दुसऱ्या जिल्ह्यातून कर्मचारी परत गेल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत वीज पुरवठा दहा ते पंधरा दिवसांत चालू होईल असे वीज अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तसेच बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात टीम या कामांसाठी आली आहे असेही त्यांनी सांगितले. आता यामध्ये खरे कोणाचे मानायचे असा प्रश्न सामान्य जनतेपुढे पडला आहे. तटकरेंच्या भितीमुळे हे अधिकारी खोटे बोलले का ? असा प्रश्न सुद्धा जनतेला पडला आहे.