शोले : तीन मजली इमारतीच्या पत्र्यावर तरुणाची मद्यधुंद मस्ती

बचाव पथकानी चार तासांत सुखरूप आणले खाली

महाड : रविवारी दुपारी शहर पोलिस ठाण्याच्या शेजारील एका तीन मजली इमारती वरील पत्राशेडवर एक तरुण धुवाँदार पावसात मद्यधुंद अवस्थेत शोले स्टाईल हैदोस घालण्याचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. या मद्यधुंद तरुणाला बचावपथकांनी चार तासाच्या अथक प्रयत्ना नंतर सुखरूप खाली आणण्यात यश मिळविले. दिवस भर सोशल मिडीयावर हा प्रकार पहावयास मिळाला.
या घटनेची माहिती अशी की विजय भालेकर असे या तरुणाचे नाव असून शहरांत तो भाजी विक्रीचा व्यवसाय करतो सध्या त्याला व्यावसायाचा तणाव त्यात दारुच व्यसन जडल आहे. रविवारी शहरांत दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यात शहर पोलिस ठाण्या शेजारील तीन मजली इमारतीवर दारुच्या बॉटलसह विजय भालेकर हा तरुण काही नागरिकांना आढळून आला होता.

विजय भालेकर मद्यात एवढा गुंगला होता सुरुवातीला तो शोले सिनेमात पाण्याच्या टाकीवरून धमेंद्र हेमामालिनीशी लग्न करण्यासाठी मावशीला उद्देशून जसा ड्रामा करीत होता तसा विजय भालेकर तिसऱ्या मजल्यावरील उंचावरील पत्र्यावर उड्या मारीत आपल्या नातेवाईकाना शिवीगाळ करीत चक्क पत्रे तोडू लागला होता.

या घटनेची माहिती समजताच महाड नगरपालिकेच अग्नीशमनदल, शहर पोलिस, स्थानिक नागरिक, सिस्केप बचाव पथक विजय भालेकरला खाली उतरण्याची वारंवार विनंती केली मात्र तो काही ऐकण्याच्या मनस्थित नव्हता तर त्याच्या वर्तनाने त्याचा पत्र्या वरून जमिनीवर पडून जिव धोक्यात आला होता.

अखेर चार तांसाच्या अथक प्रयत्ना नंतर विजय भालेकर याला सुखरूप खाली आणण्यात बचाव पथकाला यश आले यांनंतर त्याला शहर पोलिसांच्या स्वाधिन करून याप्रकरणी अधिक तपास पोलिस करित आहेत दिवसभर या घटनेची चर्चा परिसरात रंगली होती.