पनवेल शहरामध्ये काही अटींसह दुकाने सुरु करण्याचा महापालिका आयुक्तांचा निर्णय

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत इतर दुकानेही सुरू करावीत, अशी मागणी महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाने आयुक्तांकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने ठरवून दिलेल्या वारानुसार सकाळी ७ ते

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत इतर दुकानेही सुरू करावीत, अशी मागणी महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाने आयुक्तांकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने ठरवून दिलेल्या वारानुसार सकाळी ७ ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान ही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली असून, यावेळी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; अन्यथा आढावा घेऊन दोनच दिवसांत निर्णय मागे घेतला जाईल, असा इशारा आयुक्त गणेश देशमुख यांनी दिला  आहे.

 कोरोना संक्रमण वाढत असताना  पनवेल महानगरपालिकेचा समावेश रेडझोनमध्ये करण्यात आला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा वगळता विविध दुकानेपनवेलमध्ये बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहेत त्यामुळे  महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेटू घेऊन पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील विविध प्रश्नांसंदर्भात आणि व्यापारी दुकाने  सुरू करण्याबाबत महापौर डॉ कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर , स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, भाजप पनवेल सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील,  नगरसेवक अनिल भगत यांनी २ दिवसांपूर्वी चर्चा केली . त्यामुळे  जीवनमान पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने दैनंदिन जीवनमानाशी निगडित असलेल्या विविध आस्थापनांना विविध व शर्तीच्या आधारे सुरु करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला.  पालिकेने यापूर्वी घोषित केलेले कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी विविध व्यवसाय सुरु करण्याची परवानगी  देण्यात आली आहे. व्यापारी संकुले तसेच मॉल्सवरील निर्बंध यामध्ये कायम राहणार आहेत. सकाळी ७  ते सायंकाळी ५  वाजेपर्यंत ही दुकाने सुरु राहणार आहेत. दुकाने सुरु करताना सामाजिक अंतर ( सोशल डिस्टन्सिंग ) राखण्याची जबाबदारी प्रत्येक दुकानदाराची असणार आहे. दुकानदारांना मास्क , सॅनिटायझर , ग्लोव्हज तसेच ओळखपत्र घालणे अनिवार्य राहणार आहे. विशेष म्हणजे दुकानदारांनी ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्याचे निर्देश आले आहेत. पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याचबरोबर मान्सूनपूर्व अनेक कामे लॉकडाऊनमुळे रखडल्याने नागरिकांनाही कामे पूर्ण करून घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर राखून व पालिकेने दिलेल्या निर्देशाचे पालन करून घराबाहेर पडावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होणार आहेत .

ही दुकाने सुरू राहणार – १) .सोमवार व शुक्रवार – स्टेशनरी,जनरल स्टोअर्स, हार्डवेअर, बांधकाम साहित्य, स्टील, सिमेंट ट्रेडर्स, पावसाळी प्रावरणे  (उदा.ताडपत्री , प्लास्टिक बंदी नसलेले प्रावरण २). मंगळवार व  शनिवार  –  ऑटोमोबाइल्स दुकाने, वर्कशॉप, वाहन गॅरेज ३). बुधवार  व रविवार  –  इलेकट्रीक , इलेक्ट्रॉनिक्स दुकाने,मोबाईल विक्री , कॉम्प्युटर, गॅस , कुकर , मिक्सर आदींसह भांड्यांची दुकाने ४). गुरुवार  – होजिअरी,रेडिमेन्ट गारमेंट दुकाने,कपड्यांची दुकाने,(शोरूम्सन वगळून )

जिम, स्विमिंग पूल , तसेच मॉल्स याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचाा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने या आस्थापनांना या निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारची सूट नसणार आहे.