दिलासादायक – श्रीवर्धनमधील ५ कोरोनाबाधितांपैकी ३ रुग्ण झाले बरे

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्याच्या दृष्टीने दिलासादायक बातमी समोर आली आहे. श्रीवर्धनमधील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पाच व्यक्तींमधील तीन व्यक्तींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे

 श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्याच्या दृष्टीने दिलासादायक बातमी समोर आली आहे. श्रीवर्धनमधील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पाच व्यक्तींमधील तीन व्यक्तींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात परत आणण्यात आले आहे. गावामध्ये एका बंद असलेल्या घरामध्ये या व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे. सदर कोरोना बाधित व्यक्ती व त्याची पत्नी अद्यापही पनवेल येथे इस्पितळात उपचार घेत आहेत. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासकीय सूचनांचे पालन करावे व घरातच राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावांमधील एक कुटुंब मुंबईच्या वरळी जनता कॉलनी या ठिकाणी राहत होते. ज्या वेळेला मुंबईमध्ये वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट होता त्याच काळामध्ये हे कुटुंब खाजगी गाडी करून श्रीवर्धन येथे आपल्या गावी आले होते. या कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाला कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे पनवेल येथे १२ एप्रिल रोजी पाठवण्यात आले होते. त्यानंतर १७ एप्रिल रोजी या कुटुंबप्रमुखाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर श्रीवर्धन तालुक्यात खूप मोठी खळबळ उडाली. तातडीने भोस्ते गाव सील करण्यात आले. गावामधील सर्व नागरिकांचा प्रवेश बाहेरच्या ठिकाणी बंद करण्यात आला तर बाहेरच्या व्यक्तींनाही गावामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येत होता. या कुटुंबाला जो कारचालक मुंबईहून घेऊन आला होता त्याला पकडण्यासाठी अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी केले होते. या कार चालकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्यामुळे  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे देखील विलगीकरण  करण्यात आले आहे.  पहिला कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या २८ जणांना कोरोना टेस्टसाठी पनवेल येथे नेण्यात आले होते. या २८ जणांपैकी ४ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. हे चारही जण कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातीलच त्यांची पत्नी व मुले आहेत. त्यातील तिघांटी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे.