श्रीवर्धन तालुक्यात वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यात व श्रीवर्धन शहरात देखील वीज पुरवठा वारंवार खंडित होणे नित्याचेच झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. लोक घराबाहेर पडत नाहीयेत,

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यात व श्रीवर्धन शहरात देखील वीज पुरवठा वारंवार खंडित होणे नित्याचेच झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. लोक घराबाहेर पडत नाहीयेत, त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवणे आवश्यक आहे. परंतु वीज पुरवठा वारंवार खंडित का होतो याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे दूरध्वनीवर संपर्क साधला असता इन्कमिंग लाईन नादुरुस्त झाली आहे तिचे काम झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत होईल असे उत्तर मिळते. वास्तविक पाहता उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यातच लॉकडाऊन मुळे सर्व नागरिक आपापल्या घरांमध्ये बंद आहेत. अशा परिस्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर व घरातील सर्व सदस्य एकत्र घरात असल्यानंतर उष्णतेचे प्रमाण अधिकच वाढते. तरी तालुका प्रशासनाने देखील वारंवार वीजपुरवठा खंडित का होतो याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करून नागरिकांना जास्तीत जास्त वेळ वीज पुरवठा सुरू राहील असे पाहावे. दिवसादेखील वीज पुरवठा एक ते दीड तास, दोन तास, इतका खंडित होतो. तर रात्रीच्या वेळेला देखील वीस मिनिटे, एक तास  एवढा वेळ वीजपुरवठा खंडित होतो. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा जास्तीत जास्त वेळ सुरळीत राहील यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.