श्रीवर्धनमध्ये पैसे चोरण्यासाठी ‘त्यांनी’ धुंडाळले आख्खे घर, पण पैसे न मिळाल्याने बॅग घेऊन चोर झाले फरार

श्रीवर्धन: दोन वर्षांपूर्वी श्रीवर्धन शहरात घरफोड्यांचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढले होते. एका रात्रीमध्ये आठ ते दहा घरे फोडली जात होती. मात्र हेचोर केवळ बंद असलेली घरे फोडत असत.त्यानंतर

 श्रीवर्धन: दोन वर्षांपूर्वी श्रीवर्धन शहरात घरफोड्यांचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढले होते. एका रात्रीमध्ये आठ ते दहा घरे फोडली जात होती. मात्र हेचोर केवळ बंद असलेली घरे फोडत असत.त्यानंतर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले व चोऱ्याचे सत्र थांबले. मात्र २९ एप्रिल रोजी घडलेला प्रकार आश्चर्यकारक आहे. सायंकाळी ८.३० वाजता इब्राहिम फकी यांच्या घरी एक वयस्कर महिला घरात एकटीच होती. या चोरट्यांनी घराचे दार उघडे आहे पाहून घरात प्रवेश केला व वयस्कर असलेल्या महिलेला बांधून ठेवले व तिच्या तोंडात कापडाचा बोळा भरला.त्यानंतर तिच्याकडे खुणेने पैशाची मागणी करत होते. या वयस्कर स्त्रीने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घ्यायला सांगितले. मात्र चोरट्यांनी त्या गोष्टीसही नकार दिला. त्यानंतर चोरट्यांनी घरातली कपाटे, बॅगा व विविध ठिकाणी कुठे पैसे आहेत का हे पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कोठेही पैसे आढळून आले नाहीत. त्यामुळे चोरट्यांनी घरातील एक प्रवासी बॅग घेऊन त्या ठिकाणाहून पोबारा केला. त्यानंतर श्रीवर्धन पोलिसांमध्ये फिर्याद दाखल झाल्यानंतर श्रीवर्धन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खिरड, पोलीस हवालदार तुकाराम महाडिक पोलीस नाईक जयेंद्र पेडवी करत आहेत. गुन्ह्याच्या तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.