म्हसळा तालुक्यात आणखी २ चाकरमान्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह

म्हसळा : म्हसळा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता वाढत असून मुंबईतुन आलेल्या काही चाकरमान्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न होत आहे. तालुक्यातील दुर्गवाडी, पाभरे, गायरोने, तळवडे या

म्हसळा : म्हसळा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता वाढत असून मुंबईतुन आलेल्या काही चाकरमान्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न होत आहे. तालुक्यातील दुर्गवाडी, पाभरे, गायरोने, तळवडे या गावातून प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यांपैकी दुर्गवाडी गावातील एका इसमाचा याअगोदर मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी मिळालेल्या माहितीनुसार आणखी दोन जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. 

वारळ गावातील एका ६० वर्षीय महिलेचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या महिलेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आज मिळाली आहे. तर मुंबईतील कांदिवली विभागातून कणघर गावात आलेल्या एका ६२ वर्षीय मुंबईकर चाकरमानी यांचादेखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणेश कांबळे यांनी दिली आहे.