पेण तालुक्यात आज आढळळे १६ नवीन कोरोना रुग्ण

पेण : पेण तालुक्यात आज एकाच दिवशी कोरोनाचे १६ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने पेणकरांच्या चिंतेत भर पडली आहे. यामध्ये बेणसे येथील ५, तांबडशेत येथील १, रोहिदास नगर येथील ५, हनुमान आळी येथील २, सागर

पेण : पेण तालुक्यात आज एकाच दिवशी कोरोनाचे १६ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने पेणकरांच्या चिंतेत भर पडली आहे. यामध्ये बेणसे येथील ५, तांबडशेत येथील १, रोहिदास नगर येथील ५, हनुमान आळी येथील २, सागर सोसायटी येथील २ आणि चिंचपाडा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६ वर पोहोचली आहे.

आज बेणसे येथील ५ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. बेणसे गावातील एका व्यक्तीचे पाच-सहा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते. या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या पत्नी, बहीण, मुलगा, घरकाम करणारी बाई आणि दुकानात काम करणारा कामगार अशा एकूण पाच जणांना कोरोनाची लागण लागली आहे. या सर्वांना पुढील उपचारासाठी पनवेलला हलविण्यात आले आहे. तांबडशेत येथील एका ३४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

रोहिदास नगर येथे पाच रुग्ण आज आढळले असून, ३८ वर्षीय महिला, १५ वर्षीय आणि ९ वर्षीय मुलगे, १३ वर्षीय आणि ५ वर्षीय मुली अशा पाच जणांना कोरोना झाला आहे. हनुमान आळी येथील २० वर्षीय तरुणी आणि ४५ वर्षीय महिला अशा दोघांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर सागर सोसायटीत राहणार्‍या ३६ वर्षीय महिला आणि १२ वर्षीय मुलगी अशा दोन जणांना आज कोरोनाची लागण झाली आहे. याव्यतिरिक्त चिंचपाडा येथील ४० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे, आज तालुक्यातील १२ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. यामध्ये सागर सोसायटीतील ७, वडगांव येथील ४ आणि उत्कर्षनगर येथील १ रुग्णाचा समावेश आहे. आज आढळून आलेल्या १६ पॉझिटीव्ह रुग्णांमुळे पेण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८६ वर पोहोचली आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, ४४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.