रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ६३ नवीन रुग्ण, चौघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ६३ नवीन रुग्ण सापडले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर ५६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ४४ , पनवेल ग्रामीणमध्ये ७ , पेण ६ , उरण

 पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ६३ नवीन रुग्ण सापडले असून चौघांचा  मृत्यू झाला आहे. तर ५६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ४४ , पनवेल ग्रामीणमध्ये ७ , पेण ६ , उरण , अलिबाग ३  आणि माणगावमध्ये २ रुग्ण सापडले आहेत.  आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३  आणि कर्जतमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १८५३ झाली असून जिल्ह्यात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात आज  कोरोनाचे ६३  नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यात ५१  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ४४  नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये ३ वर्षीय आणि ५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कळंबोली सेक्टर ५ पल्लवी सोसायटीतील ६३ वर्षीय व्यक्ती , नवीन पनवेल सेक्टर१८ मधील ६४ वर्षीय व्यक्ती आणी खारघर सेक्टर ४ ए /३ येथील ७६ वर्षीय व्यक्तीचा आणि कर्जतमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये ७ ,पेण ६ , अलिबाग ३, माणगाव २ आणि उरणमध्ये १  एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात आजपर्यंत ५५५४  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १८५३  पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच ८२  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १३४५  जणांनी मात केली असून ४२६  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात ८२  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.