skeleton

महाड(mahad) औद्योगिक वसाहतीमधील(MIDC) बंद कारखान्याच्या वापरात नसलेल्या निवासी संकुलात एक मानवी सांगाडा(skeleton found in mahad) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

    महाड: महाड(mahad) औद्योगिक वसाहतीमधील(MIDC) बंद कारखान्याच्या वापरात नसलेल्या निवासी संकुलात एक मानवी सांगाडा(skeleton found in mahad) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामागचे गूढ उकलण्याचा प्रयत्न एमआयडीसी पेालीस करित आहेत.

    ज्या निवासी संकुलात हा मानवी सांगाडा आढळून आला, ते संकुल महाड औद्योगिक वसाहतीमधील इंटरनॅशनल होमटेक्स या कारखान्याचे आहे. हा कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे.  हे निवासी संकुल देखील वापरात नाही.

    सौरभ दास (रा. पिडीलाईट कॉलनी) हा तरुण सुट्टीनिमित्त आपल्या घरी आला होता. मंगळवारी तो इंटरनॅशनल होमटेक्स या कारखान्याच्या निवासी संकुलात फिरण्यासाठी गेला असता, त्याला हा मानवी सांगाडा आढळून आला. याची माहिती त्याने एमआयडीसी पेालिसांना दिल्यानंतर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा सांगाडा ताब्यात घेत, पोलिसांनी तो तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठविला आहे. तर सांगाड्याच्या मांडीचे हाड आणि दात न्यायवैद्यक प्रयोगशाळेत डी. एन. ए. तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार हे करित आहेत.

    हा मानवी सांगाडा किमान दोन ते अडीच वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

    इंटरनॅशनल होमटेक्स हा कारखाना आणि कारखान्याचे हे निवासी संकुल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात असतात. निवासी संकुलाच्या आवारात एक मृतदेह पडला आहे. ही बाब या सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास कशी आली नाही याबद्दल आर्श्चय व्यक्त होत असतानाच, बंद कारखाने आणि निवासी संकुलांच्या सुरक्षा रक्षकांच्या आणि सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सींच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे.