चक्रीवादळ होऊन गेल्यानंतर, श्रीवर्धन शहरातील कचऱ्याचे ढीग उचलण्याचे काम संथगतीने ?

३ जुन रोजी संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याला "निसर्ग"चक्रीवादळाने उध्वस्त करुन टाकले आहे. केवळ तीन तासात वादळाने होत्याचे नव्हते करुन टाकले. तालुक्यातील ९५ टक्के घरांचे मोठ्या प्रमाणात

 ३ जुन रोजी संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याला “निसर्ग”चक्रीवादळाने उध्वस्त करुन टाकले आहे. केवळ तीन तासात वादळाने होत्याचे नव्हते करुन टाकले. तालुक्यातील ९५ टक्के घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. श्रीवर्धन शहरातील नारळ सुपारीच्या व केळीच्या बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. तसेच तालुक्यातील आंबा व काजूच्या बागा देखील भुईसपाट झाल्या आहेत. श्रीवर्धन शहरात अनेक झाडे, तसेच मोठे वृक्ष बुंधातून उन्मळून पडले आहेत. इन डी आर एफ च्या टीमने झाडे कापून मार्ग मोकळे करुन दिले आहेत.

मात्र पालापाचोळा, तुटलेल्या पत्र्याचे व कौलांचे ढीग उचलण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाकडून अत्यंत संथगतीने सुरू आहे. अद्याप झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झालेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तरी नगरपरिषद प्रशासनाने कचऱ्याचे ढीग जलदगतीने उचलण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.