The bodies of three members of the same family were found hanging from a tree; Sensation in Shahapur village over suspicious death

शहापूर : एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी शहापुरमध्ये उघडकीस आला होता. आता यांच्या मृत्यूमागचे खळबळजनक कारण समोर आले आहे. मोक्ष मिळावा म्हणून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

४ नोव्हेंबरपासून नितीन भेरे (रा. शहापूर), महेंद्र दुभेले (रा.चांदा ३०, खर्डी) व मुकेश घायवट ( रा. चांदा २२, खर्डी) हे तिघे अचानक बेपत्ता झाले होते. याबाबत सर्वत्र तपास करूनही त्यांचा शोध न लगल्याने त्यांच्या नातेवाईकांनी १७ नोव्हेंबर रोजी शहापूर व खर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. शुक्रवारी सकाळी त्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने सर्वांना धक्काच बसला.

मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि इतरही काही वस्तू आढळून आल्या आहेत. नितीन याला मंत्र-तंत्राचं आकर्षण होतं. ते तिघेही बऱ्याच वेळा धार्मिक ठिकाणी एकत्र यायचे. अमावस्येला मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, या अंधश्रद्धेतूनच तिघांनी गळफास घेऊन जीव दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.