rape

पेण (pen)येथे ३० डिसेंबरला आदिवासी समाजातील एका ३ वर्षीय बालिकेला घरातून उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार करुत हत्या करण्यात आली होती. या पीडित बालिकेच्या कुटुंबाला सामाजिक न्याय विभागाकडून ४ लाख १२ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत(help to rape victim family) देण्यात आली आहे.

अलिबाग : पेण (pen)येथे ३० डिसेंबरला आदिवासी समाजातील एका ३ वर्षीय बालिकेला घरातून उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार करुत हत्या करण्यात आली होती. या पीडित बालिकेच्या कुटुंबाला सामाजिक न्याय विभागाकडून ४ लाख १२ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत(help to rape victim family) देण्यात आली आहे.

रायगडच्या जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता संनियंत्रण समिती, रायगड आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ सुधारित अधिनियम, २०१५ व सुधारित नियम, २०१६ अंतर्गत तातडीच्या मदतीस मंजुरी दिली.

त्या अनुषंगाने अत्याचारग्रस्त बालिकेच्या आई-वडिलांना ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेश आणि एक महिना पुरेल इतक्या अन्नधान्याचे किट ५ जानेवारीला सायंकाळी सुपूर्द करण्यात आले. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी ही कार्यवाही तातडीने पूर्ण केली.

अत्याचारग्रस्त बालिकेच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश देताना सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्यासह पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, पेण उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण, पेण तहसिलदार अरुणा जाधव, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, समाज कल्याण निरीक्षक अंकुश पोळ उपस्थित होते.