चाकरमान्यांना कोकणात परत येण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा – सुशांत सकपाळ

पाली : मुंबई,ठाणे,पालघरसारख्या दाट वस्तीच्या शहरात राहणाऱ्या कोकणवासीयांना त्यांच्या गावाकडे परत येण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करावी, अशी मागणी रिपाई कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ

 पाली : मुंबई,ठाणे,पालघरसारख्या दाट वस्तीच्या शहरात राहणाऱ्या कोकणवासीयांना त्यांच्या गावाकडे परत येण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करावी, अशी मागणी रिपाई कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे.मुंबईसारख्या सर्व सोयींनी युक्त असलेल्या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने झोपडपट्टीत,चाळी मध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांची चिंताही वाढू लागली आहे. कोकणातील चाकरमानी मुंबईमध्ये १०x१० सारख्या खोलीत दाटीवाटीने राहत आहेत. तसेच अनेक ठिकाणी सर्वांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. या भीतीमुळे मुंबईतील चाकरमान्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आता मुंबईत राहायचे नसून कोकणातील आपापल्या गावी सुखरूप परत यायचे आहे.त्यासाठी कोकणातील चाकरमान्यांना गावी परत येण्याकरिता विशेष रेल्वेची मागणी केंद्र सरकारकडे करावी, अशी विनंती सुशांत सकपाळ यांनी केंद्रीय मंत्री रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. तसेच  रामदासजी आठवले हे मुख्यमंत्रांची भेट घेणार असल्याने कोकणवासीयांना लवकरच दिलासा मिळेल, असे आश्वासनदेखील देण्यात आले आहे.