कशेडी घाटातील बोगद्याच्या कामाला गती; २०२१ च्या प्रारंभी पूर्ण होण्याची शक्यता

कशेडी बोगद्याचे (Tunnel) पोलादपूर बाजू कडील ८०० मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. पोलादपूर तालुक्या तील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे उत्खनन सुरू असून, आतापर्यंत अर्धा किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला. बोगद्यातील कनेक्टि व्हिटीचा (Connectivity) भुयारी मार्गही पूर्ण झाला आहे. खेड तालुक्याकच्या बाजूने सुरू झालेल्या बोगद्याचे कामही वेगाने सुरू असून, २०२१ वर्षाच्या प्रारंभी ते पूर्ण होईल, अशी चिन्हे आहेत.

 पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri)  या दोन जिल्ह्यांना जोडणारा कशेडी घाट ( Kashedi Ghat) हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या घाटातील धोकादायक वळणांमुळे अनेक जीवघेण्या अपघाताच्या घटना घडतात. या दुर्घटना टाळण्यासाठी आणि चाकरमान्यांचा प्रवास कमी वेळात, सुखकर व सुरक्षित करण्यासाठी १.८० आणि १.९० किमीचे दोन स्वतंत्र बोगदे बनविण्याचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. कशेडी बोगद्याचे (Tunnel) पोलादपूर बाजू कडील ८०० मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. पोलादपूर तालुक्या तील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे उत्खनन सुरू असून, आतापर्यंत अर्धा किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला. बोगद्यातील कनेक्टि व्हिटीचा (Connectivity) भुयारी मार्गही पूर्ण झाला आहे. खेड तालुक्याकच्या बाजूने सुरू झालेल्या बोगद्याचे कामही वेगाने सुरू असून, २०२१ वर्षाच्या प्रारंभी ते पूर्ण होईल, अशी चिन्हे आहेत.

कशेडी घाटात रस्त्याचे चौपदरीकरण शक्य‍ नसल्याने भारतीय पद्धतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्यात येत आहे. घाटात ३.४४ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फास्ट्रक्चनर कंपनीने घेतले. त्यासाठी ४४१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी होणार असून, दोन भुयारी मार्ग असतील. त्यातील करारानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित आहे. आपत्कालात उपयुक्त असलेले वायूविजन सुविधेचे एक भुयारही यात समाविष्ट आहे. पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किलोमीटरच्या टप्प्यात दोन्ही भुयारी मार्गांना जोडणाऱ्या कनेक्टिवव्हिटीचा भुयारी मार्ग तयार झाला. आतील भागात परत यू टर्न घेणाऱ्या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्टिरव्हिटी भुयारी मार्गाने होईल. डोंगरात खेडच्या बाजूने हे काम सुरू करण्यात आले होते.

कातळ फोडण्यासाठी “बूमर’ यंत्र

कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासाठी एक अत्याधुनिक भुयार खोदकामाचे यंत्र म्हणजेच बूमर वापरण्यात येत असून, याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात आहेत. २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची अशा पद्धतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारातील पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर होतो. हे कातळाचे दगड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामात वापरले जातात. या कामासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील खवटी येथून २०१९च्या पावसाळयापूर्वीच भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. पोलादपूर ते खेड या दरम्यान असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगातून असणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या डोंगरातून खेड बाजूने हे काम सुरू झाल्यानंतर आजमितीस साधारणपणे ८०० मीटर अंतराचा भुयारी मार्ग झाला आहे. नैसर्गिकदृष्टय़ा धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, अवजड व रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी यामुळे खडतर झालेला मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास आता आरामदायी व कमी वेळेचा होणार आहे.

या घाटात आता बोगदा बांधण्याचे काम वेगाने सुरू असून खेड हद्दीतील काम ८० टक्के पूर्ण झाले आहे या बोगद्यामुळे वाहनचालकांना वळणा वळणाच्या घाटातून गाडी नेण्याचीही कसरत करावी लागणार नाही. शिवाय ४० मिनिटांच्या या प्रवासाचे हेच अंतर केवळ १० ते १२ मिनिटांत कापता येणार आहे बोगद्यामध्ये जाण्यासाठी तीन व येण्यासाठी तीन अशा एकूण सहा लेन असतील व टप्याटप्याने पाच एमरजन्सी क्रॉस लाईन असणार आहेत बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी चार वर्षे ठेकेदारावरच राहणार आहे. कशेडी बोगदा हा चौपदरीकरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

सध्या भुयारी मार्गाच्या कामाला वेग आला असून पोलादपूर दिशेने व खेड दिशेने काम वेगाने सूरु आहे त्यामुळे २०२१ अखेर पर्यंत काम होईल.

अमोल शिवतरे, डीपीएम अधिकारी