एसटी चालकाचा  धक्कदायक प्रताप दुथडीभरून वाहणाऱ्या नदीच्या पूलावरून नेली एसटी बस

या चालकाने बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालून गाडी पूल दिसत नसतानाही नदीवरील पुलावरुन नेल्याने अनेकांनी संताप व्यक्त केलाय. या चालकावर कारवाई करण्याची मागणी होत असली तरी ही एसटी नक्की कुठून कुठे जात होती?, एसटीचा चालक कोण होता?, त्याने असा निर्णय का घेतला यासारखे प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत.

    राज्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणातही मुसळधार पावासाची नोंद झाली आहे. अशातच महाडतालुकत्यात एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचं पाणी नदीवरील पुलावरुन जात असतानाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाने बस घेऊन नदी ओलांडल्याचं दिसत आहे.

    व्हायरल झालेला हा व्हिडीओ महाडमधील रेवतळे येथील आहे. या व्हिडीओमध्ये नदीचे पाणी पुलावरुन वाहत असतानाही चालकाने बस नदीवरील पुलावरुन नेल्याचं दिसत आहे. या चालकाने बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालून गाडी पूल दिसत नसतानाही नदीवरील पुलावरुन नेल्याने अनेकांनी संताप व्यक्त केलाय. या चालकावर कारवाई करण्याची मागणी होत असली तरी ही एसटी नक्की कुठून कुठे जात होती?, एसटीचा चालक कोण होता?, त्याने असा निर्णय का घेतला यासारखे प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत.