एस.टी गाड्या काही ठिकाणी सुरू, तर जादा पसंती खासगी वाहनांची

ऑगस्ट २०२० मध्ये काही ठिकाणच्या एसटीच्या गाड्या सुरू करण्यात आल्या. गणपती सण लक्षात घेऊन प्रवाशांची कुचंबणा होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यातील बहुतांश आगारातून लांब तसेच जवळच्या पल्ल्यांच्या गाड्या सोडण्यात आल्या. दीड दिवसांचे, पाच दिवसांच्या तसेच अनंत चतुर्थीच्या गणपतींचे विसर्जन झाले. एस.टी ला हवे तसे प्रवासी मिळाले नाहीत. कारण आजही अनेकांच्या मनात कोरोनाची मोठी भीती आहे.

 सुतारवाडी : कोरोना काळात मार्च महिन्यापासून राज्यात महाराष्ट्र राज्य मंडळाच्या सर्व गाड्या बंद होत्या. त्यांना करोडो रूपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागला. मात्र ऑगस्ट २०२० मध्ये काही ठिकाणच्या एसटीच्या गाड्या सुरू करण्यात आल्या. गणपती सण लक्षात घेऊन प्रवाशांची कुचंबणा होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यातील बहुतांश आगारातून लांब तसेच जवळच्या पल्ल्यांच्या गाड्या सोडण्यात आल्या. दीड दिवसांचे, पाच दिवसांच्या तसेच अनंत चतुर्थीच्या गणपतींचे विसर्जन झाले. एस.टी ला हवे तसे प्रवासी मिळाले नाहीत. कारण आजही अनेकांच्या मनात कोरोनाची मोठी भीती आहे. त्यामुळे गावी आलेले चाकरमनी खासगी वाहनांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी जास्त पसंती दिल्याचे चित्र स्पष्ट दिसले.

२२ प्रवाशी असतील तर एस. टी महामंडळ एक गाडी सोडण्याचे कबूल केले परंतु अनेक जण खाजगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करत होते. अनेक एस.टी च्या गाड्या जवळजवळ रिकाम्याच धावताना दिसत होत्या. एस.टी चा प्रवास हा सुरक्षित आणि सुखकर असताना सुद्धा प्रवासी खासगी वाहनांनी जाणे पसंत करत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

यापूर्वी गणपती सण झाला की एसटीच्या गाड्या भरून जायच्या अगोदर आरक्षण करून ठेवायचे मात्र खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाल्याने अनेक जणांची ओढ तिकडे आहे. एस.टी महामंडळाने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी सध्या प्रवाशांची ओढ खासगी वाहनांकडे जास्त असल्याचे दिसत आहे.