Strict action should be taken against the culprit by investigating the death of journalist Santosh Pawar
पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करावी

  • प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 
  • पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना तात्काळ ५० लाख रूपयांची मदत द्यावी

पेण : रायगड जिल्ह्यातील(raigad district) माथेरानचे (matheran) पत्रकार संतोष पवार (Journalist Santosh Pawar) यांचा कोरोनामुळे (corona) दुर्देवी मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करावी तसेच त्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची तात्काळ मदत करावी अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांनी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार संतोष पवार यांना कर्जतवरून नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील रूग्णालयात (d y patil hospital) ॲम्ब्युलन्समधून घेऊन जात असताना रस्त्यातच सिलेंडरमधील ऑक्सिजन संपल्यांने कर्मचा-यांना दुसरा सिलेंडर योग्य प्रकारे लावता न आल्याने संतोष पवार यांना जीव गमवावा लागला आहे.

शासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे संतोष पवार यांचा मृत्यू झाल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे लातूरचे पत्रकार गंगाधर सोमवंशी, पुण्याचे पत्रकार पांडूरंग रायकर यांच्यासह संतोष पवार यांचा मृत्यू होणं दु:खदायक असल्याची भावना पत्रकारांमध्ये दिसून येत आहे. राज्यामध्ये काही पत्रकारांवर अद्याप उपचार सुरू असून दिवसेंदिवस बाधित पत्रकारांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारने बाधित पत्रकारांच्या उपचाराची विशेष व्यवस्था करावी. कोरोनामुळे मृत पावलेले पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना मा. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ५० लाख रूपयांची मदत द्यावी.

पांडुरंग रायकर आणि संतोष पवार निर्माण होणार नाही याची जबाबदारी आपल्या आरोग्य विभागाने घ्यावी अशीही मागणी निवेदणात करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे, पेण संघटनेचे दिपक लोके, स्वप्निल पाटील, राजेश कांबळे, किरण बधांकर, प्रशांत पोतदार, गणेश पाटील, मितेश जाधव, संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, राज्य महिलाध्यक्षा सुजाता गुरव, राज्य महिला कार्याध्यक्षा सविता कुलकर्णी आदींनी मागणी केली आहे.